IND vs BAN: दिग्गज कपिल देव, अश्विन आणि हरभजनचा विक्रम मोडला, टीम इंडियाचा हुकमी एक्का कोण?

मुंबई तक

23 Sep 2024 (अपडेटेड: 23 Sep 2024, 03:10 PM)

Ravindra Jadeja Most Fifty And Five Wicket Haul Record : रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाने बांगलादेशच्या फलंदाजांना गुंडाळलं. दोघांच्या चमकदार कामगिरीमुळं भारताने चेन्नईत झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला.

Ravindra Jadeja Latest Record

Ravindra Jadeja Latest News

follow google news

बातम्या हायलाइट

point

बांगलादेश विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात भारताच्या अष्टपैलू खेळाडूने इतिहास रचला

point

दिग्गज कपिल देव, रविचंद्रन अश्विन आणि हरभजन सिंगचा विक्रम मोडला

point

'या' दोन खेळाडूंच्या चमकदार कामगिरीमुळं भारताने बांगलादेशचा पराभव केला

Ravindra Jadeja Most Fifty And Five Wicket Haul Record : रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजाने बांगलादेशच्या फलंदाजांना गुंडाळलं. दोघांच्या चमकदार कामगिरीमुळं भारताने चेन्नईत झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला. अश्विनने (88 धावा देऊन 6 विकेट्स) घेतल्या. त्यामुळे अश्विनला प्लेयर ऑफ द मॅचने सन्मानित करण्यात आले. अश्विनने घरच्या मैदानात शतकी खेळी करून 5 विकेट्स घेतल्या. भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या पलटणने पहिल्या कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवला.

हे वाचलं का?

रविंद्र जडेजाने रचला इतिहास

बांगलादेश विरुद्ध गोलंदाजी आणि फलंदाजीत धमाका करणारा जडेजा पुन्हा एकदा प्रकाशझोतात आला आहे. जडेजाच्या नावावर टेस्ट क्रिकेटच्या मोठ्या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे. जडेजा टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक वेळा एका सामन्यात अर्धशतकीय खेळी आणि पाचपेक्षा जास्त विकेट घेणारा पहिला भारतीय बनला आहे. अश्विन आणि जडेजा एकमेव खेळाडू आहेत, ज्यांनी आपल्या करिअरमध्ये 10 हून अधिक वेळा अशी कामगिरी केली आहे.

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana List: लाडकी बहीण योजनेची 1500 रुपयांची नवीन लिस्ट पाहिली का? लगेच तपासा तुमचं नाव

याआधी दिग्गज कपिल देव यांनी (7) वेळा अशाप्रकारची कामगिरी केली आहे. त्यानंतर हरभजन सिंगच्या नावाची नोंद आहे. त्याने तीनवेळा हा कारनामा केला आहे.जडेजाने शांतोला 82 धावांवर रन आऊट केलं. बुमराहने अप्रतिम झेल घेतल्यामुळं शांतोला माघारी परतावं लागलं.  तसच अश्विनने पुन्हा एकदा भेदक गोलंदाजी करत तस्कीन अहमदला बाद करून सहावा विकेट घेतला. या खेळाडूंच्या अप्रतिम कामगिरीमुळं भारताने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. जडेजाने हसून महमदचा विकेट घेतला.

रविचंद्रन अश्विन भारतासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 5 विकेट्स घेणारा पहिला खेळाडू ठरला आहे. चेन्नईच्या टेस्टमध्ये त्याने 37 वेळा 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे दुसऱ्या स्थानावर आहे. कुंबळेने टेस्टमध्ये 35 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. चेन्नईत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या अश्विनला प्लेयर ऑफ द मॅच किताबाने सन्मानीत करण्यात आले. अश्विनने आतापर्यंत दहाव्यांदा अशाप्रकारची चमकदार कामगिरी केली आहे.

    follow whatsapp