Team India Squad For 2nd Test Againts Bangladesh : चेन्नईत झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा धुव्वा उडवत 280 धावांनी विजय मिळवला. आता बांगलादेश विरुद्ध भारताचा दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरदरम्यान कानपूरमध्ये रंगणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाच्या स्क्वॉड जाहीर करण्यात आला आहे. बीसीसीआयने अधिकृत एक्स अकाऊंटवर भारताच्या संघाची घोषणा केली आहे. या दुसऱ्या कसोटी सामन्यातही कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर असणार आहे. तर विकेटकिपिंगची जबाबदारी रिषभ पंतला देण्यात आली आहे. (In the first test match held in Chennai, Team India defeated Bangladesh by 280 runs. India's second test match against Bangladesh will be played in Kanpur from 27th September to 1st October)
ADVERTISEMENT
बांगलादेश विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, के एल राहुल, सर्फराज खान, रिषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana List: लाडकी बहीण योजनेची 1500 रुपयांची नवीन लिस्ट पाहिली का? लगेच तपासा तुमचं नाव
पहिला कसोटी सामन्या जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने मोठी प्रतिक्रिया दिली होती. रोहित माध्यमांशी बोलताना म्हणाला,"पुढे काय होणार आहे, हे पाहण्यासाठी एक जबरस्त रिझल्ट होता. आम्ही मोठ्या विश्रांतीनंतर खेळत आहोत. पण तुम्ही क्रिकेटपासून कधीही वेगळे होत नाहीत. आम्ही एक आठवड्यापूर्वी इथे आलो होतो. पंत शतकीय कामगिरीवर रोहित म्हणाला, तो खूप कठीण काळातून गेला आहे. ज्या प्रकारे त्याने स्वत:ला सांभाळलं आहे, हे प्रेरणादायी आहे. त्याने आयपीएलमध्ये पुनरागमन केलं. त्यानंतर वर्ल्डकपमध्ये यश मिळालं. हा त्याचा सर्वात आवडता फॉर्मेट आहे. त्याल हे सर्व श्रेय दिलं पाहिजे.
परिस्थिती कशीही असो, आम्हाला टीम बनवायची आहे. तुम्हाला खेळाडूंना श्रेय द्यावे लागेल. लाल मातीची खेळपट्टी काही ना काही देत असते. तुम्हाला थोडा धीर ठेवावा लागेल. या खेळपट्टीवर आम्ही फलंदाजी आणि गोलंदाजीच्या माध्यमातून प्रतीस्पर्धी संघावर दबाव टाकला. रोहित अश्विनबाबत बोलताना म्हणाला, तो नेहमी गोलंदाजी आणि फलंदाजीच्या माध्यमातून आमच्यासाठी सज्ज असतो. तो कधीही खेळापासून वेगळा राहत नाही, असंही रोहित शर्माने म्हटलं होतं.
ADVERTISEMENT