IND vs BAN: इंडिया WIN! पण अश्विनने मोडला 'या' दिग्गज खेळाडूचा विक्रम, 3 मोठ्या विक्रमांना घातली गवसणी

Ravichandra Ashwin Test Cricket Records: चेन्नईत बांगलादेश विरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 280 धावांनी दणदणीत विजय मिळवला. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने आघाडी घेतली आहे.

Ravichandran Ashwin Latest News

Ravichandran Ashwin Breaks Courtney Walsh Record

मुंबई तक

22 Sep 2024 (अपडेटेड: 22 Sep 2024, 07:22 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

रविचंद्रन अश्विनची टेस्ट क्रिकेटमध्ये उत्तुंग भरारी

point

अश्विनने दिग्गज खेळाडूचा विक्रम मोडून रचला इतिहास

point

बांगलादेश विरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा रोमहर्षक विजय

Ravichandra Ashwin Test Cricket Records: चेन्नईत बांगलादेश विरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने 280 धावांनी दणदणीत विजय मिळवला. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने आघाडी घेतली आहे. भारताचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनने पहिल्या डावात बांगदेशच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. अश्विनने आठव्या क्रमांकावर फलंदाजी करून 133 चेंडूत 113 धावांची अप्रतिम शतकी खेळी केली. त्यानंतर बांगलादेशच्या डावात अश्विनने भेदक गोलंदाजी करून पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली. अश्विनने 21 षटकांच्या गोलंदाजीत 4.19 च्या इकॉनोमीनं 88 धावा देत 6 विकेट्स घेण्याची उल्लेखनीय कामगिरी केली. याशिवाय अश्विनने या सामन्यात खास कारनामेही केले. (n the first test match against Bangladesh in Chennai, India won by 280 runs. India has taken the lead in both the test matches)

हे वाचलं का?

टेस्ट क्रिकेटमध्ये 37 वेळा रविचंद्रन अश्विनने पंजा उघडला

रविचंद्रन अश्विन भारतासाठी टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा 5 विकेट्स घेणारा पहिला खेळाडू ठरला आहे. चेन्नईच्या टेस्टमध्ये त्याने 37 वेळा 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे दुसऱ्या स्थानावर आहे. कुंबळेने टेस्टमध्ये 35 वेळा 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

हे ही वाचा >> Rohit Sharma Video  : "नेहमी काही ना काही...", भारत जिंकला पण रोहित शर्माच्या प्रतिक्रियेमुळं खळबळ

अश्विनला दहाव्यांदा बनला 'प्लेयर ऑफ द मॅच' 

चेन्नईत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या अश्विनला प्लेयर ऑफ द मॅच किताबाने सन्मानीत करण्यात आले. अश्विनने आतापर्यंत दहाव्यांदा अशाप्रकारची चमकदार कामगिरी केली आहे.

अश्विनने टेस्ट क्रिकेटमध्ये कर्टनी वॉल्शला मागे टाकलं

रविचंद्रन अश्विनने टेस्ट क्रिकेटमध्ये कर्टनी वॉल्शला सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या कामगिरीत मागे टाकलं आहे. वॉल्शने वेस्ट इंडिजसाठी 132 टेस्टमध्ये 242 इनिंगमध्ये 519 विकेट्स घेतले आहेत. तर चेन्नई टेस्टनंतर अश्विनच्या नावावर 522 विकेट्सची नोंद झाली आहे. एव्हढच नाही, तर अश्विन टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा 8 वा गोलंदाज बनला आहे. श्रीलंकेचा माजी दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन पहिल्या स्थानावर आहे. त्यांनी 133 टेस्टमध्ये 230 इनिंगमध्ये 800 विकेट्स घेण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 

हे ही वाचा >>  Raj Thackeray : "तो सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही", लोकप्रिय अभिनेत्याला इशारा

रोहित शर्मा काय म्हणाला?

परिस्थिती कशीही असो, आम्हाला टीम बनवायची आहे. तुम्हाला खेळाडूंना श्रेय द्यावे लागेल. लाल मातीची खेळपट्टी काही ना काही देत असते. तुम्हाला थोडा धीर ठेवावा लागेल. या खेळपट्टीवर आम्ही फलंदाजी आणि गोलंदाजीच्या माध्यमातून प्रतीस्पर्धी संघावर दबाव टाकला. रोहित अश्विनबाबत बोलताना म्हणाला, तो नेहमी गोलंदाजी आणि फलंदाजीच्या माध्यमातून आमच्यासाठी सज्ज असतो. तो कधीही खेळापासून वेगळा राहत नाही."

    follow whatsapp