Sri lanka vs New Zealnad, WTC Points Table : गॉल टेस्ट सामन्यात श्रीलंकेने न्युझीलंडचा अवघ्या 63 धावांनी पराभव केला आहे. या सामन्यात श्रीलंकेने न्युझीलंडला 275 धावांचे टार्गेट दिले होते.या लक्ष्याचा पाठलाग करताना न्युझीलंड संघ 211 धावांवर गारद झाला होता.त्यामुळे श्रीलंकेने 63 धावांनी हा सामना जिंकला आहे. या विजयासह श्रीलंकेने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. श्रीलंकेने या विजयासह सामना तर जिंकलाच त्यासोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या पॉईट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ केली आहे. श्रीलंकेच्या या उलथापालथीमुळे टीम इंडिया नेमकी कितव्या स्थानावर पोहोचली आहे? हे जाणून घेऊयात. (sri lanka vs new zealand sl won by 63 runs wtc points table ranking change icc world test championship team india rank)
ADVERTISEMENT
गॉल टेस्ट सामन्यातील विजयानंतर श्रीलंकेच्या संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. श्रीलंकेचा संघ याआधी चौथ्या स्थानी होता, आता तो या विजयासह तिसऱ्या स्थानी पोहोचला आहे. श्रीलंकेने सध्या एकूण आठ सामने खेळले आहेत, ज्यामधील 4 सामने जिंकले आहेत, तर तितक्याच सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या खात्यात 48 गुण आहेत.
हे ही वाचा : VIDEO : 'मिया भाई' थेट बांग्लादेशच्या कर्णधारालाच भिडला, सामन्या दरम्यान मैदानात तुफान राडा
श्रीलंकेचा संघ आता जास्तीत जास्त 69.23 टक्के गुण मिळवू शकतो, जे त्यांना पुढील वर्षी लॉर्ड्सवर होणाऱ्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी पुरेसे असतील. मात्र, यासाठी संघाला पुन्हा एकदा न्यूझीलंडचा पराभव करून दक्षिण आफ्रिकेसह ऑस्ट्रेलियाचा सूपडा साफ करणे गरजेचे आहे.
भारताचा कितवा नंबर ?
भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशीपच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. कारण भारताने आतापर्यंत 10 सामन्यांपैकी 7 सामने जिंकले आहेत, तर 2 सामन्यात पराभव झाला आहे आणि एक सामना अनिर्णित ठरला होता. त्यामुळे भारताची गुणांची टक्केवारी 71.66 सह खात्यात 86 गुण आहेत.
आता भारताला आणखी 9 सामने खेळायचे आहेत. भारतीय संघ नोव्हेंबरमध्ये पाच कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. त्या दौऱ्यापूर्वी त्याला बांगलादेशविरुद्ध 1 आणि न्यूझीलंडविरुद्ध 3 कसोटी खेळायची आहे. या 9 कसोटी सामन्यांमध्ये भारताने चार सामने जिंकले आणि एक सामना अनिर्णित राहिला तर भारताचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित होईल. अशा स्थितीत भारताला 64 टक्के गुण मिळतील, जे अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी पुरेसे असतील.
हे ही वाचा : IND vs BAN: दिग्गज कपिल देव, अश्विन आणि हरभजनचा विक्रम मोडला, टीम इंडियाचा हुकमी एक्का कोण?
दुसऱ्या स्थानी कोण?
WTC टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. कांगारू संघाचे 12 सामन्यांत 8 विजय, 3 पराभव आणि एक बरोबरीत 90 गुण आहेत. त्याच्या गुणांची टक्केवारी 62.50 आहे. दुसरीकडे, श्रीलंकेविरुद्धच्या पराभवामुळे न्यूझीलंडचा संघ WTC गुणतालिकेत चौथ्या स्थानावर घसरला आहे. न्यूझीलंडचे सात सामन्यांत 42.86 टक्के गुण आणि 36 गुण आहेत. इंग्लंड पाचव्या तर बांगलादेश सहाव्या स्थानावर आहे.
ADVERTISEMENT