IPL 2021 : CSK लागली तयारीला, धोनी चेन्नईत दाखल

मुंबई तक

• 04:59 AM • 04 Mar 2021

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सध्या इंग्लंडसोबत टेस्ट मॅच खेळत आहे. दुसरीकडे बीसीसीआय आणि टीम ओनर्सनी आयपीएलच्या आगामी सिझनच्या तयारीला सुरुवात केली आहे. आयपीएल २०२० मध्ये खराब कामगिरीमुळे लिग स्टेजमधून बाहेर फेकल्या गेलेल्या चेन्नई सुपरकिंग्जने आपल्या टीमच्या कँपला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून संघाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी चेन्नईत दाखल झाला आहे. चेन्नई सुपरकिंग्जने […]

Mumbaitak
follow google news

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सध्या इंग्लंडसोबत टेस्ट मॅच खेळत आहे. दुसरीकडे बीसीसीआय आणि टीम ओनर्सनी आयपीएलच्या आगामी सिझनच्या तयारीला सुरुवात केली आहे. आयपीएल २०२० मध्ये खराब कामगिरीमुळे लिग स्टेजमधून बाहेर फेकल्या गेलेल्या चेन्नई सुपरकिंग्जने आपल्या टीमच्या कँपला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून संघाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी चेन्नईत दाखल झाला आहे. चेन्नई सुपरकिंग्जने आपल्या सोशल मीडिया हँडलवर त्याचा फोटो टाकला आहे.

हे वाचलं का?

चेन्नईचा महत्वाचा आणि अनुभवी खेळाडू अंबाती रायुडू सर्वात आधी चेन्नईच्या कँपमध्ये दाखल झाला आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात चेन्नई सुपरकिंग्ज आपल्या कँपला सुरुवात करणार आहे. बीसीसीआयने अद्याप आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची तारीख जाहीर केलेली नाही. परंतू आयपीएल २०२० मध्ये खराब कामगिरीमुळे चर्चेत राहिलेल्या चेन्नईने यंदाच्या सिझनमध्ये कोणतीही कसर न ठेवण्याचं ठरवलं आहे.

काही दिवसांपूर्वीच चेन्नईत झालेल्या लिलावामध्ये CSK ने इंग्लंडचा मोईन अली, कर्नाटकचा कृष्णप्पा गौथम यांना आपल्या संघात स्थान दिलं होतं. या दोघांव्यतिरीक्त चेन्नईने चौदाव्या सिझनसाठी चेतेश्वर पुजारा, हरीशंकर रेड्डी, भगत वर्मा, हरी निशांत यांनाही आपल्या संघात स्थान दिलंय.

    follow whatsapp