IPL मधील Chris Gayle ची तुफानी खेळी, आजही कायम आहे तो 'महारेकॉर्ड'!

रोहिणी ठोंबरे

23 Apr 2024 (अपडेटेड: 23 Apr 2024, 06:57 PM)

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) च्या इतिहासात 23 एप्रिल हा दिवस खूप खास आहे. 11 वर्षांपूर्वी म्हणजेच 2013 मध्ये याच दिवशी कॅरेबियन दिग्गज ख्रिस गेलने इतिहास रचला होता. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये गेलने अशी जबरदस्त तुफानी खेळी खेळली होती की त्याचा रेकॉर्ड आजही कोणत्या फलंदाजाला मोडता आलेला नाहीये.

Mumbaitak
follow google news

Chris Gayle Record break Playing In IPL 2013 : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) च्या इतिहासात 23 एप्रिल हा दिवस खूप खास आहे. 11 वर्षांपूर्वी म्हणजेच 2013 मध्ये याच दिवशी कॅरेबियन दिग्गज ख्रिस गेलने इतिहास रचला होता. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये गेलने अशी जबरदस्त तुफानी खेळी खेळली होती की त्याचा रेकॉर्ड आजही कोणत्या फलंदाजाला मोडता आलेला नाहीये. (on this day chris gayle smashes 175 runs in ipl rcb vs pwi match fastest hundred in t20 cricket)

हे वाचलं का?

त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) कडून खेळणाऱ्या ख्रिस गेलने पुणे वॉरियर्स (PWI) विरूद्ध केवळ 66 बॉलमध्ये नाबाद 175 धावा केल्या होत्या. यावेळी ख्रिस गेलने 13 चौकार आणि 17 षट्कार मारेल आणि त्याचा स्ट्राइक रेट 265.15 होता. टी-20 क्रिकेटमधील ख्रिस गेलची ही सर्वात मोठी खेळी होती. यादरम्यान त्याने अवघ्या 30 बॉलमध्ये आपले शकत पूर्ण केले. टी-20 क्रिकेटच्या इतिहासातील हे सर्वात वेगवान शतक ठरले. गेलचे हे दोन्ही विक्रम आजही कायम आहेत.

ख्रिस गेलने या तुफानी खेळीसह ब्रेंडन मॅक्कुलमचाही रेकॉर्ड मोडला होता. माहितीनुसार, आयपीएलमध्ये यापूर्वी सर्वाधिक धावसंख्याचा विक्रम ब्रेंडन मॅक्कुलमच्या नावावर होता, त्याने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) कडून खेळताना 2008 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 73 चेंडूत 158 धावा केल्या होत्या.

T20 क्रिकेटमधील सर्वात मोठी खेळी

  • 175 धावा - ख्रिस गेल विरुद्ध पुणे वॉरियर्स, बंगळुरू, 2013
  • 172 धावा- अरॉन फिंच विरुद्ध झिम्बाब्वे, हरारे, 2018
  • 162 धावा- हॅमिल्टन मसाकादझा विरुद्ध ईगल्स, बुलावायो, 2016
  • 162 धाव- हजरतुल्ला झाझाई विरुद्ध आयर्लंड, डेहराडून, 2019
  • 162 धावा- डेवाल्ड ब्रेव्हिस विरुद्ध नाइट्स, पॉचेफस्ट्रूम, 2022

T20 क्रिकेटमधील सर्वात वेगवान शतक

  • 30 चेंडू ख्रिस गेल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध पुणे वॉरियर्स, 2013
  • 32 चेंडूत ऋषभ पंत दिल्ली विरुद्ध हिमाचल प्रदेश, 2018
  • 33 चेंडू विहान लुब्बे नॉर्थ वेस्ट वि लिम्पोपो, 2018
  • 33 चेंडू जॉन निकोल लॉफ्टी-ईटन नामिबिया विरुद्ध नेपाळ, 2024
  • 34 चेंडू अँड्र्यू सायमंड्स केंट वि मिडलसेक्स, 2004
  • 34 चेंडू शॉन ॲबॉट सरे विरुद्ध केंट, 2023
  • 34 चेंडूत कुशल मल्ला नेपाळ विरुद्ध मंगोलिया, 2023

त्या ऐतिहासिक सामन्यात पुणे वॉरियर्सचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण ओपनिंगला आलेल्या ख्रिस गेलने फिंचचा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरवला. गेलच्या वादळी फलंदाडीपुढे पुण्याच्या सर्व गोलंदाजांनी शरणागती पत्करली. 20 षटकांच्या खेळीदरम्यान ख्रिस गेलने 9 व्या षटकातच शतक पूर्ण केले. 100 धावा पूर्ण करताना गेलने 11 षटकार आणि एक चौकार मारून 28 धावा केल्या.

ख्रिस गेलच्या 175 धावांच्या जबरदस्त खेळीमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पाच गडी गमावून 263 धावा केल्या. प्रत्युत्तरात पुणे वॉरियर्स संघाला 20 षटकात 9 गडी बाद 133 धावाच करता आल्याने त्यांना 130 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. फलंदाजीनंतर गेलने चेंडूवरही कहर केला आणि दोन विकेट्स घेतल्या. यावेळी त्याची 'प्लेअर ऑफ द मॅच' म्हणून निवड करण्यात आली. 

    follow whatsapp