आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पाकिस्तान संघाचा कॅप्टन बाबर आझमने एका अनोख्या विक्रमाची नोंद केली आहे. झिम्बाब्वेविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात खेळत असताना बाबर आझमने भारताचा कर्णधार विराट कोहलीला धोबीपछाड दिला आहे. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये बाबर आझम सर्वात जलद २ हजार रन्सचा टप्पा ओलांडणारा बॅट्समन ठरला आहे.
ADVERTISEMENT
झिम्बाब्वेविरुद्ध हरारे स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या तिसऱ्या टी-२० सामन्यात बाबर आझमने हा विक्रम केला आहे. बाबर आझमने ५२ इनिंगमध्ये ही कामगिरी करुन दाखवली आहे. याआधी भारतीय संघाचा कॅप्टन विराट कोहलीने ५६ इनिंगमध्ये अशी कामगिरी करुन दाखवली होती, मात्र आता हा विक्रम बाबर आझमच्या नावे जमा झाला आहे.
बाबर आझम आणि विराट कोहली यांच्या व्यतिरीक्त या यादीत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अरॉन फिंच आणि न्यूझीलंडचा माजी प्लेअर ब्रँडन मॅक्युलम हे अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत. फिंचने ६२ इनिंगमध्ये तर मॅक्युलमने ६६ इनिंगमध्ये टी-२० क्रिकेटमध्ये २ हजार रन्सचा टप्पा ओलांडला होता.
दरम्यान तिसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तानने मोहम्मद रिझवानची नाबाद हाफ सेंच्युरी आणि त्याला बाबर आझमने ५२ रन्स करुन दिलेल्या उत्तम साथीच्या जोरावर १६५ रन्सपर्यंत मजल मारली.
ADVERTISEMENT