India Vs Pakistan Asia Cup :
ADVERTISEMENT
यावर्षीचा आशिया चषक (Asia Cup) पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. पण ही स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानमध्ये (Pakistan) जाण्यास भारताने (India) स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे या स्पर्धेतील भारताच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलं होतं. पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) आशिया चषक आपल्या देशात आयोजित करण्यासाठी आणि या स्पर्धेत भारतीय संघालाही खेळवण्यासाठी मध्यममार्ग काढला आहे. (The Indian team will play Asia Cup matches in another country. In this, India’s matches can be played in any one of the countries UAE, Oman, Sri Lanka or England.)
यानुसार भारतीय संघाला ही स्पर्धा खेळण्यासाठी पाकिस्तानात जाण्याचीही गरज भासणार नाही. भारतीय संघ आपले सामने दुसऱ्या देशात खेळणार आहे. यात युएई, ओमान, श्रीलंका किंवा इंग्लंड यापैकी कोणत्याही एका देशात भारताचे सामने पार पडू शकतात. पण आशिया चषक स्पर्धेसंदर्भात भारतीय संघाच्या सामन्यांचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही.
ESPNcricinfo ने आपल्या अहवालात याबाबतची माहिती दिली आहे. भारतीय संघाच्या सामन्यांचे ठिकाण ठरवण्यासाठी त्या देशातील हवामानाची विशेष काळजी घेतली जाणार आहे. यावर्षीचा आशिया कप सप्टेंबरमध्ये खेळवला जाणार आहे. पण यूएईमध्ये सप्टेंबरच्या सुरुवातीला तापमान साधारणपणे ४० अंशापर्यंतच्या आसपास असते. पण, अशा परिस्थितीतही तिथं क्रिकेट खेळलं जातं. आयपीएल 2021 चा हंगामही सप्टेंबरच्या शेवटी यूएईमध्येच खेळला गेला होता. 2021 च्या T20 विश्वचषकाच्या पहिल्या फेरीचे काही सामने ओमानची राजधानी मस्कत येथे झाले होते. याशिवाय इंग्लंड हा देखील एक चांगला पर्याय असू शकतो.
आशिया चषक स्पर्धेत एकूण 13 सामने खेळले जाणार
भारत, पाकिस्तान, गतविजेता श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि एक पात्रता संघ असे यावेळी आशिया कपमध्ये फक्त 6 संघ सहभागी होणार आहेत. हे सर्व संघ दोन गटात विभागले जाणार आहेत. दोन्ही गटांतर्गत 6 संघांमध्ये एकूण 6 सामने खेळवले जातील. त्यानंतर दोन्ही गटातील टॉप-2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीत 4 संघांमध्ये राऊंड रॉबिन पद्धतीने एकूण 6 सामने खेळवले जातील. यानंतर दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील आणि त्यांच्यामध्ये विजेतेपदाचा सामना खेळला जाईल. अशाप्रकारे आशिया चषक 2023 मध्ये फायनलसह एकूण 13 सामने खेळवले जाणार आहेत.
Ind vs Aus :टीम इंडियाचा शेवट कडू; ऑस्ट्रेलियाने 2-1 ने मालिका घातली खिशात
भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने
यावेळच्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा एकाच गटात समावेश आहे. या गटातील तिसरा संघ पात्रता फेरीतून उतरेल. श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान दुसऱ्या गटात राहतील. यावेळीही स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात किमान तीन सामने होण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT