Lakshya Sen : बॅडमिंटन कोर्टवर रक्त सांडलं, पट्टी बांधून खेळला तरी पदकाचं स्वप्न भंगलं!

प्रशांत गोमाणे

• 10:54 PM • 05 Aug 2024

Lakshya Sen : मलेशियाच्या जी जियाने लक्ष्य सेनचा 21-13, 16-21, 21-11 असा पराभव केला आहे. हा सामना खेळताना बॅडमिंटन कोर्टवर लक्ष्यच रक्त देखील सांडलं होत. पण पट्टी बांधुन त्यांनी शेवटपर्यंत लढा दिला होता. मात्र हा लढा यशस्वी होऊ शकला नाही आणि त्याला कांस्यपदक गमवालं लागलं.

paris olympic 2024 badminton lakshya sen lost bronz medal against malesiya lee zii jia

मलेशियाच्या जी जियाने लक्ष्य सेनचा 21-13, 16-21, 21-11 असा पराभव केला आहे.

follow google news

बातम्या हायलाइट

point

बॅडमिंटन कोर्टवर लक्ष्यच रक्त देखील सांडलं होत.

point

पट्टी बांधुन त्यांनी शेवटपर्यंत लढा दिला

point

मात्र हा लढा यशस्वी होऊ ठरला नाही

Paris Olympic 2024, Lakshya Sen : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आज बॅडमिंटनपट्टू लक्ष्य सेनकडून पदकाची आशा होती. मात्र लक्ष्य सेनचं हे स्वप्न भंगलं आहे.  मलेशियाच्या जी जियाने लक्ष्य सेनचा  21-13, 16-21, 21-11 असा पराभव केला आहे. हा सामना खेळताना बॅडमिंटन कोर्टवर लक्ष्यच रक्त देखील सांडलं होत. पण पट्टी बांधुन त्यांनी शेवटपर्यंत लढा दिला होता. मात्र हा लढा यशस्वी होऊ शकला नाही आणि त्याला कांस्यपदक गमवालं लागलं.  (paris olympic 2024 badminton lakshya sen lost bronz medal against malesiya lee zii jia)  

हे वाचलं का?

लक्ष्य सेनने पहिल्या गेममध्ये पहिला गुण नोंदवून आपले खाते उघडले. यानंतर स्कोअर 2-3 झाला. तेव्हा लक्ष्य सेनने सलग तीन गुण घेत स्कोअर 6-2 असा आपल्या नावे केला. मलेशियाच्या खेळाडूने पुनरागमन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण लक्ष्यने भक्कम बचाव करत आक्रमण सुरूच ठेवले आणि 11-5 अशी आघाडी घेतली. यानंतर मलेशियाच्या खेळाडूने काही चमकदार स्मॅश दाखवले पण तो लक्ष्याच्या खूप मागे होता. लक्ष्यने शेवटपर्यंत आपले वर्चस्व कायम राखले आणि पहिला गेम 21-13 असा जिंकला.

हे ही वाचा : Sachin Waze : सचिन वाझेंच्या 'त्या' लेटरबॉम्बमध्ये जयंत पाटलांचं नाव कसं आलं?

दुसऱ्या गेममध्येही लक्ष्य सेनने पहिला गुण मिळवला. यानंतर लक्ष्यने पुन्हा आक्रमण सुरूच ठेवले आणि स्कोअर 1-1 झाल्यानंतर सलग सहा गुण मिळवत सुरुवातीला 7-1 अशी भक्कम आघाडी घेतली. मात्र 3-8 ने पिछाडीवर असलेल्या जियाने दमदार खेळ दाखवत सलग 9 गुण मिळवत 12-8 अशी आघाडी घेतली.त्यानंतर ली जी जियाचा शॉट कोर्टच्या बाहेर गेला आणि रिव्ह्यू घेतल्यानंतर लक्ष्यने बऱ्याच वेळानंतर पॉइंट मिळवला आणि स्कोर 9-12 असा केला. त्यानंतर सामना 12-12 असा बरोबरीत असताना मलेशियाच्या खेळाडूने लक्ष्यावर आक्रमण करत 14-12 अशी आघाडी घेतली.

सामन्या दरम्यान झाली दुखापत 

सामन्यादरम्यान लक्ष्य सेनला दुखापत झाली होती. त्याच्या कोपरातून रक्त वाहू लागलं होतं. त्यानंतर त्याने कोपऱ्याला टेप बांधून देखील खेळ सूरूच ठेवला होता. त्यावेळी टेपमधून देखील रक्त येऊ लागले होते.  लक्ष्य सेन 16-19 असा पिछाडीवर असताना त्याला दुखापत झाली होती. त्यानंतर मलेशियाच्या खेळाडूने पुनरागमन करत दुसरा गेम 21-16 असा जिंकला.

तिसऱ्या गेममध्ये ली जी जियाने जोरदार आक्रमण आणि बॅक लाइन आणि नेटमध्ये उत्कृष्ट खेळ दाखवत स्कोअर 3-2 असा असताना सलग सहा गुण मिळवले आणि लक्ष्य सेनसमोर 9-2 अशी भक्कम आघाडी घेतली. यानंतर लक्ष्य सेनने निश्चितपणे काही गुण मिळवले पण मलेशियाच्या खेळाडूने कोर्टच्या प्रत्येक कोपऱ्यात जाऊन शटल आपल्या दिशेने पडू दिली नाही, लक्ष्याच्या प्रत्येक शॉटला उत्तर देताना त्याने 16-8 अशी आघाडी घेतली त्याने पुनरागमन केले आणि शेवटी मलेशियाच्या खेळाडूने लक्ष्याचा 21-11 असा पराभव करून कांस्यपदक जिंकले.

हे ही वाचा : Uddhav Thackeray: शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत कलह, थेट राजीनामे... नेमकं काय घडलं?

भारतानं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंत तीन कांस्य पदकं जिंकली आहेत. तीन कांस्य पदकं नेमबाजी क्रीडा प्रकारात भारतानं जिंकली आहेत. लक्ष्य सेन ऑलिम्पिकमध्ये बॅडमिंटनमध्ये पदक मिळवणारा पहिला पुरुष खेळाडू ठरला असता.  पण त्याचं पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. 

    follow whatsapp