PV Sindhu Paris Olympic 2024 Journey Ends : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या सहाव्या दिवसाची सुरुवात ही भारतासाठी अभिमानाची बाब असली तरी दिवसाचा शेवटही निराशाजनक झाला. ऑलिम्पिक 2024 च्या सहाव्या दिवशी, एकीकडे नेमबाज स्वप्नील कुसाळेने भारताला तिसरे पदक मिळवून दिले, तर दुसरीकडे देशाची स्टार शटलर पीव्ही सिंधूची ऑलिम्पिकमधील पदकांची हॅट्रिक हुकली आणि तिचा पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील प्रवास संपला. सिंधूच्या पराभवानंतर भारताचं हक्काचं पदक हुकलं असच म्हणता येईल. (paris olympic 2024 pv sindhu journey ends at round of 16 lost to he bingjiao)
ADVERTISEMENT
पीव्ही सिंधूचा राउंड ऑफ 16 मध्ये पराभव
भारताच्या बॅडमिंटन विश्वाला मोठा धक्का बसला आहे. देशाची स्टार शटलर पीव्ही सिंधूचा पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा प्रवास राउंड ऑफ 16 मध्येच संपला. पीव्ही सिंधूचा चीनच्या 'ही बिंगजियाओ'ने 21-19, 21-14 असा पराभव केला. हे पहिले ऑलिम्पिक आहे ज्यात सिंधूची पदक न जिंकता एक्झिट झाली. यापूर्वी तिने रिओ 2016 मध्ये रौप्य पदक आणि टोकियो 2020 मध्ये कांस्य पदक जिंकले होते.
हेही वाचा : Maharashtra Weather: मुंबईसह 'या' जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार पाऊस; IMD चा सतर्कतेचा इशारा
पीव्ही सिंधू दुसऱ्यांदा कमबॅक करू शकली नाही
पीव्ही सिंधूने पहिल्या सेटमध्ये चांगली सुरुवात केली, पण नंतर बिंगजियाओने आघाडीवर येत बाजी मारली. सिंधूने 12-12 आणि नंतर 19-19 अशी बरोबरी साधली, पण शेवटी बिंगजियाओने पहिल्या सेटमध्ये 21-19 असा स्कोर करत विजय मिळवला. सिंधूने दुसऱ्या सेटमध्येही कमबॅक करण्याचा प्रयत्न केला, मात्र बिंगजियाओने 21-14 असा स्कोर करत दुसऱ्यांदा बाजी मारली आणि सिंधूचा पराभव केला.
हेही वाचा : Mazi Ladki Bahin Yojana: आता 'लाडकी बहीण' योजनेचा अर्ज काही मिनिटांत होणार अपलोड; नवीन वेबसाइट सुरू!
पराभवानंतर पीव्ही सिंधूने सांगितली मोठी गोष्ट
पीव्ही सिंधूने तिचा सर्वोत्तम प्रयत्न केला पण ही बिंगजियाओचे आक्रमण जोरदार होते. अखेर सिंधूला पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवानंतर सिंधू खूपच निराश दिसली. विशेषत: दुसऱ्या सेटमध्ये ती आपल्या चुकांवर नियंत्रण ठेवू शकली नाही, असे तिने सांगितले.
पीव्ही सिंधू म्हणाली, "हे निराशाजनक आहे... एक जिंकेल आणि एक हरेल, आणि आज मी हरले.." यानंतर ती म्हणाली, "मी माझ्या चुकांवर नियंत्रण ठेवायला हवे होते... विशेषत: दुसऱ्या गेममध्ये मला हे करावे लागले. तसेच वाटले... हे दुःखद आहे की मी त्याचे विजयात रूपांतर करू शकले नाही, पहिल्या गेममध्ये स्कोअर 19-19 होता."
ADVERTISEMENT