Indian Hockey Team: "सरपंच साहेबांनी मोठं..."; श्रीजेशच्या निवृत्तीनंतर PM मोदी नेमकं काय म्हणाले?

PM Modi On Indian Hockey Team: भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये चमकदार कामगिरी करून कांस्य पदक जिंकलं. ब्रॉन्झ मेडलच्या या सामन्यात भारताने स्पेनचा २-१ नं पराभव केला होता. भारतीय संघाच्या या विजयात गोलकीपर पीआर श्रीजेशचा मोलाचा वाटा होता.

PM Modi On PR Sreejesh

PM Narendra Modi

मुंबई तक

• 01:47 PM • 16 Aug 2024

follow google news

बातम्या हायलाइट

point

खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव करताना PM मोदी काय म्हणाले?

point

भारतीय संघाने ५२ वर्षानंतर रचला इतिहास 

point

शेवटची टूर्नामेंट खेळणाऱ्या पीआर श्रीजेशची ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी

PM Modi On Indian Hockey Team: भारतीय हॉकी संघाने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये चमकदार कामगिरी करून कांस्य पदक जिंकलं. ब्रॉन्झ मेडलच्या या सामन्यात भारताने स्पेनचा २-१ नं पराभव केला होता. भारतीय संघाच्या या विजयात गोलकीपर पीआर श्रीजेशचा मोलाचा वाटा होता. शेवटची टूर्नामेंट खेळणाऱ्या पीआर श्रीजेशने ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. दरम्यान, भारताने कांस्य पदकाला गवसणी घातल्यानंतर श्रीजेशने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून निवृत्ती घेतली. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हॉकी संघातील खेळाडूंवर स्तुतीसुमने उधळली आहेत. 

हे वाचलं का?

खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव करताना PM मोदी काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलिम्पिक विभागासोबत संवाद साधला. यावेळी मोदींनी हॉकी संघाच्या खेळाडूंसोबत चर्चा केली. मोदींनी हॉकी संघाचे कर्णधार हरमनप्रीत सिंह आणि पीआर श्रीजेश यांचं कौतुक केलं. मोदींनी म्हटलं, हॉकी संघाने ५२ वर्षानंतर ऑलिम्पिक गेम्समध्ये दोनवेळा पदकं जिंकली. मोदींनी श्रीजेशच्या निवृत्तीबाबतही भाष्य केलं. "सरपंच साहेब (कर्णधार हरमनप्रीत सिंह) आणि टीमने श्रीजेशला निवृत्तीसाठी चांगल्या प्रकारे शुभेच्छा दिल्या. हा संघाचा मोठेपणा आहे. सरपंच साहेबांनी मोठं...",असं मोदी म्हणाले.

हे ही वाचा >> Uddhav Thackeray: महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा दावेदार कोण? उद्धव ठाकरेंनी थेट सांगितलं

पीआर श्रीजेशने म्हटलं, मी मागील काही दिवसांपासून या गोष्टीचा विचार करत होतो. माझ्या निवृत्तीबाबत संघातील सहकारी खेळाडूही मला विचारत होते. मी संघासाठी जवळपास गेल्या २० वर्षांपासून खेळलो आहे. त्यामुळे मी चांगल्या क्षणी निवृत्ती घोषित करेल, असं मी ठरवलं होतं. म्हणून ऑलिम्पिकसारखा मंच निवडला, ज्या ठिकाणी संपूर्ण जग खेळाचा आनंद साजरा करतात. 

हे ही वाचा >> महाराष्ट्रातील 'राज'कारण पडद्यावर झळकणार? राज ठाकरेंचा बायोपिक येणार? 'त्या' फोटोमुळं चर्चांना उधाण

भारतीय संघाने ५२ वर्षानंतर रचला इतिहास 

हॉकीत भारताने चौथं कांस्य पदक जिंकलं आहे. याशिवाय भारताने ऑलिम्पिक इतिहासात सर्वात जास्त ८ गोल्ड आणि १ सिल्वर मेडल जिंकलं आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्येही भारताने कांस्य पदक जिंकलं होतं. आता ५२ वर्षानंतर भारतीय संघाने ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला आहे. ५२ वर्षानंतर भारतीय हॉकी संघाने सलग २ मेडल जिंकले आहेत. याआधी १९६० ते १९७२ पर्यंत भारताने हॉकीमध्ये सलग ४ मेडल जिंकले होते. त्यानंतर १९७६ मध्ये देशाला कोणताही मेडल मिळाला नव्हता. त्यानंतर १९८० मध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं. 

    follow whatsapp