मुंबई क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी दिग्गज माजी खेळाडू शर्यतीत उतले आहेत. सोमवारी संध्याकाळपर्यंत प्रशिक्षकपदासाठी अर्ज करण्याची वेळ उमेदवारांना दिली होती. तोपर्यंत MCA कडे प्रशिक्षकपदासाठी ९ अर्ज दाखल झाल्याचं कळतंय.
ADVERTISEMENT
माजी मुंबईकर वासिम जाफर, अमोल मुझुमदार, साईराज बहुतुले, सुलक्षण कुलकर्णी यांनी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केलाय. रणजी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम असलेल्या वासिम जाफरने काही महिन्यांपूर्वीच उत्तराखंडच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता. याव्यतिरीक्त साईराज बहुतुले आणि अमोल मुझुमदार या दोन दिग्गजांनीही या शर्यतीत उडी घेतली आहे. मुंबईचे प्रशिक्षक रमेश पोवार यांची भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदावर निवड झाल्यानंतर MCA ने प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले होते.
कोरोनाविरुद्ध लढाईत BCCI ही मैदानात, २ हजार Oxygen Concentrators करणार दान
या ४ नावांव्यतिरक्त भारताचे माजी खेळाडू बलविंदरसिंग संधू, मुंबईचे माजी प्रशिक्षक प्रदीप सुंदरम, अफगाणिस्तानच्या संघाचे सहायक प्रशिक्षक उमेश पटवाल तसेच मुंबईत ज्युनिअर क्रिकेटशी संलग्न असलेल्या नंदन फडणीस आणि विनोद राघवन यांनीही प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. गेल्या काही हंगामात मुंबईची रणजी क्रिकेटमधली कामगिरी फारशी उल्लेखनीय झाली नसली तरीही काही महिन्यांपूर्वी पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली रमेश पोवारच्या मार्गदर्शनाखाली मुंबईने विजय हजारे ट्रॉफीचं विजेतेपद मिळवलं होतं.
ADVERTISEMENT