ADVERTISEMENT
इंदूर कसोटी सामन्याच्या पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियन संघाने भारताविरुद्ध पहिल्याच दिवशी 47 धावांनी आघाडी घेतली आहे.
पहिल्या डावात भारतीय संघाने 109 धावा केल्या, तर ऑस्ट्रेलियन संघाने 4 विकेटवर 156 धावा केल्या.
फिरकीपटू रवींद्र जडेजाने पहिल्याच दिवशी चारही विकेट घेतल्या आहेत. त्याने एका खेळाडूला दोनदा बाद केलं.
जडेजाने कसोटी सामन्यातील जबरदस्त फलंदाज मार्नस लॅबुशेनला दोनदा बाद केलंय.
ऑस्ट्रेलियाच्या डावात 4 षटके असताना लॅबुशेन पहिल्यांदा बाद झाला. त्यानंतर संघाची धावसंख्या 31 धावा होत्या.
लॅबुशेनला जडेजाने बोल्ड केलं होतं. नंतर ते नो बॉल ठरलं, ज्यामुळे तो बाद होण्यापासून वाचला.
यानंतर लॅबुशेनने उस्मान ख्वाजाच्या साथीने ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 100 धावांच्या पुढे नेली.
डावाच्या 35व्या षटकात, जडेजाने पुन्हा एकदा लॅबुशेनला क्लीन बोल्ड करत तंबूत पाठवलं.
ADVERTISEMENT