Rohit Sharma clean Bold Video viral : रविवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या राजस्थान रॉयल्स (rajsthan royals) विरूद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (mumbai indians) 3 बॉल शिल्लक ठेवून 6 विकेटसने हा सामना जिंकला.या विजयासह मुंबईच्या खेळाडूंनी कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) वाढदिवसानिमित्त मोठं गिफ्ट दिले. मात्र रोहित शर्माला या सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. कारण तो 3 धावा करून आऊट झाला.मात्र तो खऱचं आऊट होता का? असा प्रश्न आता फॅन्स उपस्थित करतायत. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे. (rohit sharma clean bold shocking video viral bell touched by sanju samson mumbai indians vs rajsthan royals)
ADVERTISEMENT
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माचा (Rohit Sharma) रविवारी वाढदिवस होता. या वाढदिवसानिमित्त मुंबईच्या फॅन्सना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तो 3 धावावर बाद झाल्याने मुंबईच्या फॅन्सची निराशा झाली आहे. मात्र आता या सामन्यानंतर तो खरंच आऊट होता का? असा प्रश्न उपस्थित होतोय. या संदर्भातला व्हिडिओ देखील समोर आला आहे.
व्हिडिओत काय?
व्हायरल व्हिडिओत संदीप शर्माने रोहित शर्माला तीन धावांवर क्लीन बोल्ड केले आहे. मात्र तो आता आऊट होता की नॉट आऊट होता असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामागचे कारण म्हणजे, संदीप शर्माने टाकलेल्या बॉल दरम्यान विकेटकीपर संजू सॅमसनच्या ग्लोव्हज स्टंपला स्पर्श झाला होता, असे व्हिडिओत दिसतेय आणि यामुळे विकेटस पडल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अंपायरच्या चुकीच्या निर्णय़ामुळे रोहित शर्मा बाद झाल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच अंपायरच्या चुकीच्या निर्णयामुळे रोहित शर्मा बाद झाल्याने वाढदिवशीच रोहितला भन्नाट गिफ्ट मिळाल्याचीही चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
असा रंगला सामना
राजस्थान रॉयल्सने 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 212 धावा ठोकल्या होत्या. या धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या यशस्वी जयस्वालने 124 धावांची शतकीय खेळी केली होती. या खेळीत त्याने 16 चौकार आणि 8 षटकार लगावले होते. यशस्वी व्यतिरिक्त कोणत्याही खेळाडूला मोठ्या धावा करता आल्या नव्हत्या. मुंबईकडून अर्शद खानने 3,पियुष चावला 2, रिले मेरेडीथ आणि जोफ्रा आर्चरने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
राजस्थानने दिलेल्या 212 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या मुंबईने 4 विकेट गमावून 214 धावा केल्या. अशाप्रकारे मुंबईने 3 बॉल शिल्लक ठेवून 6 विकेटसने सामना जिंकला. मुंबईच्या विजयाची शिल्पकार सुर्यकुमार यादव ठरलाय. कारण यादवने 55 धावांची तुफानी खेळी केली. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 2 षटकार लगावले आहेत.
ADVERTISEMENT