आता हे काय नवीन! सूर्यकुमारचा झेलच नव्हे, 'हा' होता T-20 वर्ल्डकप जिंकण्याचा टर्निंग पॉईंट, Rohit Sharma चा खुलासा

मुंबई तक

06 Oct 2024 (अपडेटेड: 06 Oct 2024, 01:18 PM)

Rohit Sharma On T20 World Cup Final Turning Points : टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला होता. फायनलच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड मिलरचा बाऊंड्री लाईनवर अप्रतिम झेल घेतला होता.

Rohit Sharma on T20 World Cup Final Turning Points

Rohit Sharma on T20 World Cup Final Turning Points

follow google news

बातम्या हायलाइट

point

टी-२० वर्ल्डकपच्या फायनलच्या सामन्याबाबत रोहित शर्माने केला मोठा खुलासा

point

'द कपिल शर्मा शो' मध्ये रोहित शर्मा नेमकं काय म्हणाला?

point

सूर्यकुमारशिवाय 'तो' खेळाडूही होता फायनलच्या सामन्याचा हिरो

Rohit Sharma On T20 World Cup Final Turning Points : टी-२० वर्ल्डकपच्या फायनलमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव केला होता. फायनलच्या सामन्यात सूर्यकुमार यादवने दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड मिलरचा बाऊंड्री लाईनवर अप्रतिम झेल घेतला होता. सूर्यकुमारच्या या झेलमुळं भारताने टी-२० वर्ल्डकपवर विजयाची मोहोर उमटवली. सूर्यकुमारने मिलरचा घेतलेला झेलच फायनलच्या सामन्यात टर्निंग पॉईंट होता, अशी चर्चा सर्वत्र रंगली होती. परंतु, आता टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने कपिल शर्मा शो मध्ये मोठा खुलासा केला आहे. (India defeated South Africa by 7 runs in the final of the T20 World Cup. In the final match, Suryakumar Yadav took an amazing catch on the boundary line of South African batsman David Miller)

हे वाचलं का?

रोहित म्हणाला, "सूर्याच्या झेलशिवाय आणखी एक एक खेळाडू आहे, ज्याने सामन्या जिंकण्यात मोलाची कामगिरी केली. रोहित म्हणाला, आमच्या हातातून सामना निसटला आहे, असं आम्हाला एका क्षणाला वाटत होतं. आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसू लागलं होतं. पण त्यावेळी कर्णधाराला मजबूत राहणं महत्त्वाचं असतं. आम्ही सामना जिंकू शकतो, असा विश्वास कर्णधारामध्ये असायला हवा.

हे ही वाचा >> Gold Rate Today : थांबा जरा! नवरात्रीत दांडिया खेळताय? मुंबईसह 'या' शहारांतील सोन्याचा भाव वाचून धडकीच भरेल

फायनलचा सामना जसजसा पुढे जात होता, त्याचदरम्यान आमच्यावर दबावही वाढत होता. त्यावेळी सामन्यात काहीही घडू शकलं असतं. पण आम्हाला विश्वास होता की, आम्ही सामना शेवटपर्यंत नेला तर काहीही होऊ शकतं. त्यांची फलंदाजी 7 नंबरपर्यंत होती. अशातच आम्हाला क्लासेन आणि डेव्हिड मिलरला बाद करायचं होतं. त्या दोघांमध्ये एकाला बाद करण्याची आवश्यकता होती. जेव्हा दक्षिण आफ्रिकेला 30 चेंडूत 30 धावांची गरज होती, त्याआधी एक छोटासा ब्रेक झाला होता. आमच्या रिषभ पंतने डोकं लावून सामना काही काळ थांबवला होता. पंतने त्याचे गुडघे दुखत असल्याचा बहाणा सांगितला होता. त्याने त्यावेळी सामन्याला स्लो केला".

पंतने दिमाग लावला आणि आमचं काम झालं, रोहित म्हणाला...

भारताचा कर्णधार रोहित शर्माने म्हटलं, "सामना वेगानं सुरु होता, त्यावेळी फलंदाजांनाही वाटत होतं की, गोलंदाजी लवकर व्हावी. त्यावेळी फलंदाज रिदममध्ये होते. आम्हाला सेट झालेल्या फलंदाजांना बाद करायचं होतं. पंतने रणनीती आखली आणि जखमी झाल्याचा बहाणा केला. त्यामुळे सामना काही काळ थांबवण्यात आला. त्यानंतर दोन्ही फलंदाजांच्या आत्मविश्वासात कमी असल्याचं दिसून आलं.

हे ही वाचा >>  Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! दिवाळीआधीच महायुती सरकारने घेतला मोठा निर्णय

त्यानंतर हार्दिकने क्लासेनला बाद केलं आणि शेवटच्या षटकात सूर्यकुमारने मिलरचा झेल घेतला. पण मला असं म्हणायचं नाही, की तो एकच कारण आहे. परंतु, पंतने खास रणनिती करून आमचं काम केलं होतं. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करून 7 विकेट्स गमावून 176 धावा केल्या होत्या. त्यानंतर या धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या आफ्रिकेनं 20 षटकात 169 धावा केल्यानं भारताचा या सामन्यात विजय झाला."
 

    follow whatsapp