Sakshi Malik Retired : ऑलिम्पिक पदक विजेती कुस्तीपटू साक्षी मलिकने (Sakshi Malik) कुस्तीतून निवृत्तीची घोषणा केली आहे. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI)च्या अध्यक्षपदी ब्रिजभूषण शरण सिंह (brij bhushan Singh) यांचे निकटवर्तीय संजय सिंग (Sanjay Singh) याची निवड झाल्यानंतर साक्षीने पत्रकार परिषद घेऊन याबाबतची घोषणा केली आहे. ‘मी कुस्ती सोडली’ असे जाहीर करत साक्षीने (Sakshi Malik) निवृत्तीची घोषणा केली आहे. या घटनेने देशात खळबळ माजली आहे. (sakshi malik retired from wrestling brijbhushan relative sanjay singh won indian wrestling federation election)
ADVERTISEMENT
काय म्हणाली साक्षी मलिक?
भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) च्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने मोठी घोषणा केली आहे. साक्षीने कुस्तीतून निवृत्त जाहिर केली आहे. साक्षी रडत रडत पत्रकार परिषदेत बोलत होती. आम्ही 40 दिवस रस्त्यावर झोपून आंदोलन केले. या दरम्यान देशाच्या विविध भागातून लोकांनी आम्हाला पाठिंबा दिला. अनेक वृद्ध महिला आल्या, ज्यांच्याकडे कमवायला पैसे देखील नव्हता ते देखील आले. आम्ही जिंकलो नाही, पण तुम्हा सर्वांचे आभार, असे म्हणत साक्षी मलिकने खंत व्यक्त केली.
आम्ही मनापासून लढलो, पण जर संजय सिंग, व्यवसाय भागीदार आणि WFI ब्रिजभूषण शरण सिंगचा जवळचा सहकारी निवडून आला, तर मी माझी कुस्ती सोडते. यादरम्यान साक्षीने तिचे शूज उचलले आणि टेबलावर ठेवत कुस्तीतून निवृत्ती जाहिर केली.
हे ही वाचा :Maratha Reservation : एका शब्दामुळे फसला आरक्षणाचा तिढा; महाजनांनी सांगितला कायदा
ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याशी संबंधित कोणतीही व्यक्ती महासंघात येणार नाही, असे क्रीडामंत्र्यांनी रेकॉर्डवर सांगितले होते. पण आजच्या निवडणुकीत ब्रिजभूषण यांचा माणूस विजयी झाला आहे. आता मुलींना न्याय मिळेल असे मला वाटत नाही,अशी प्रतिक्रिया कुस्तीपट्टू बजरंग पुनिया याने दिली आहे. न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे की ते न्याय देतील. तसेच सरकारने जे आश्वासन दिले होते ते पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत, अशी टीका देखील पुनियाने सरकारवर केली.
WFI च्या निवडणूकीत कोण जिंकला?
WFI चे अध्यक्ष, कोषाध्यक्ष, सरचिटणीस आणि वरिष्ठ उपाध्यक्ष अशा 15 पदांसाठी आज दिल्लीत निवडणूक झाली. भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक विजेती अनिता शेओरान आणि उत्तर प्रदेश कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष संजय सिंग यांच्यात लढत होती. मात्र या निवडणूकीत संजय सिंग यांनी निवडणूक जिंकली. संजय सिंह ब्रिजभूषण हे शरण सिंह यांचे निकटर्तीय आहेत.
हे ही वाचा :निवडणूक आयुक्त निवड समितीतून सरन्यायाधीश ‘आऊट’, विधेयकाला संसदेची मंजूरी
दरम्यान या निवडणूकीआधीपासूनच साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया या कुस्तीपटूंसह इतर कुस्तीपटूंना संजय सिंग निवडणूक लढवण्याबद्दल आक्षेप नोंदवला होता.
ADVERTISEMENT