ADVERTISEMENT
ऑस्ट्रेलियन दिग्गज शेन वॉर्नच्या मृत्यूला आता एक आठवड्याहून अधिक काळ लोटला आहे. शेन वॉर्नला 4 मार्च रोजी थायलंडमध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. आता त्यांचे पार्थिव ऑस्ट्रेलियाला नेण्यात आले आहे. दरम्यान, शेन वॉर्नची काउंसलर पुढे आली आहे. जिने शेन वॉर्नबद्दल अनेक गोष्टी मांडल्या आहेत.
द सनच्या वृत्तानुसार, शेन वॉर्नची काउंसलर लियान यंग म्हणतात की, शेन वॉर्न हा मागील काही काळ खूप आनंदी होता आणि त्याला असं वाटत होतं की त्याच्याकडे अजून किमान 30 वर्षांचे आयुष्य आहे. लियान यंग 2015 पासून शेन वॉर्नशी काउंसलिंगमुळे जोडली गेली होती. ती त्याला नातेसंबंधांबाबत नेहमी सल्ला देत असे.
लियानच्या मते, शेन वॉर्न पुढील आपल्या आयुष्यासाठी खूप तयारी करत होता. मुलांसोबत थोडा वेळ घालवता यावा म्हणून त्याने तीन महिने सुट्टी घेतली होती. त्याला तब्येतीची फारशी काळजी नव्हती आणि आपल्याकडे अजून तीस वर्षे बाकी आहेत असे त्याला वाटायचे.
शेन वॉर्नसोबतच्या सत्राबाबत लियान यंगने सांगितले की, ‘जेव्हा मी त्याला अनेक प्रश्न विचारले तेव्हा तो आनंदी होता. शेन वॉर्न फॅट शेमिंग फोटोंबद्दल मात्र खूप निराश झाला होता. त्यानंतरच तो 14 दिवसांच्या ज्यूस डाएटवर गेला होता. तो सतत फिटनेसवर लक्ष केंद्रित करत होता.
शेन वॉर्नचा मृत्यू झाला तेव्हा तो थायलंडमध्ये होता. शेन वॉर्न आपल्या मित्रांसोबत थायलंडमध्ये सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेला होता. येथे शेन वॉर्न एका व्हिलामध्ये थांबला होता. सुट्टीच्या दुसऱ्या दिवशी त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला.
थायलंड पोलिसांनी शेन वॉर्नचे पोस्टमॉर्टम केले, ज्यामध्ये वॉर्नचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे स्पष्ट झाले. अशा स्थितीत त्यांच्या मृत्यूमध्ये कोणत्याही फाउल प्ले आढळून आलेला नाही.
शेन वॉर्नचा मृतदेह आता ऑस्ट्रेलियात नेण्यात आला आहे. 30 मार्च रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर श्रद्धांजली सभेचे आयोजन केले जाणार आहे. ज्यामध्ये एक लाखाहून अधिक लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.
शेन वॉर्नच्या पार्थिवावरही शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. (सर्व फाइल फोटो, सौजन्य: गेटी/पीटीआय)
ADVERTISEMENT