ADVERTISEMENT
टीम इंडियाने वनडे मालिकेत न्यूझीलंडचा 3-0 ने पराभव केला.
या कामगिरीनंतर टीम इंडिया ICCच्या क्रमवारीत पहिल्या स्थानी पोहोचला आहे.
दरम्यान, सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने खेळाडूंच्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त केला.
न्यूझीलंड विरूद्धच्या तिसऱ्या सामन्याला वेगळं वळण मिळालं ते शार्दुल ठाकूरच्या खेळीमुळे!
शार्दुलने 2 षटकांत 3 बळी घेत न्यूझीलंडला बॅकफूटवर आणलं. त्यातून न्यूझीलंड संघ सावरू शकला नाही.
रोहित शर्मा शार्दुल ठाकूरच्या या कामगिरीचं कौतुक करताना म्हणाला, ‘तो एक जादूगर आहे.’
‘शार्दुल ठाकूर दीर्घ काळापासून संघासाठी हे करत आहे. संघातील लोक त्याला जादूगार म्हणतात.’
रोहित शर्माने शतकवीर शुभमन गिलसह अन्य खेळाडूंचंही भरभरून कौतुक केलं.
ADVERTISEMENT