Shaun Marsh retirement : ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडू शॉन मार्शने घेतली निवृत्ती

मुंबई तक

• 03:56 AM • 10 Mar 2023

Shaun Marsh Announce retirement : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात अहमदाबादमध्ये चौथा टेस्ट सामना खेळवला जात आहे. या सामन्या दरम्यान ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू शॉन मार्शने (Shaun Marsh) निवृत्ती जाहीर केली आहे. शॉन मार्शने प्रथम श्रेणी क्रिकेट आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली आहे.त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. […]

Mumbaitak
follow google news

Shaun Marsh Announce retirement : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात अहमदाबादमध्ये चौथा टेस्ट सामना खेळवला जात आहे. या सामन्या दरम्यान ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू शॉन मार्शने (Shaun Marsh) निवृत्ती जाहीर केली आहे. शॉन मार्शने प्रथम श्रेणी क्रिकेट आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहिर केली आहे.त्यामुळे ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. (shaun marsh announces retirement from first class cricket)

हे वाचलं का?

शेफील्ड शील्ड किताब जिंकला

ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू शॉन मार्शने (Shaun Marsh) निवृत्ती जाहीर केली आहे. शॉन मार्शने 2000-01 दरम्यान शेफिल्ड शिल्डसोबत आपल्या फर्स्ट क्लास क्रिकेट करियरला सुरूवात केली होती. शील्ड क्रिकेटमध्ये मार्शने वेस्टर्न ऑस्ट्रेलियासाठी 8 हजार 347 धावा केल्या आहेत.या धावांमध्ये त्याच्या 20 शतक आणि 43 अर्धशतकांचा समावेश आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून शील्ड क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनवण्याच्या शर्यतीत शॉन मार्श तिसऱ्या क्रमांकावर आहे.शॉन मार्शने ऑस्ट्रेलियाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये 126 सामने खेळले आहेत.

Ind vs Aus : दोन कर्णधार एकत्र! एक देशाचे दुसरा टीम इंडियाचा, व्हायरल फोटोवर भन्नाट कमेंट

कारकिर्द

शॉन मार्शने (Shaun Marsh) 38 टेस्ट सामने खेळले आहेत. या टेस्ट सामन्यात त्याने 2 हजार 265 धावा केल्या आहेत. या धावात त्याने सहा शतक ठोकली आहेत. तर त्याने 73 वनडे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 2 हजार 773 धावा केल्या आहेत.यामध्ये त्याने 7 वनडे शतक ठोकले आहेत. शॉनने 15 टी20 सामने खेळले आहेत.यामध्ये त्याने 255 धावा केल्या आहेत. शॉन मार्शने वेस्टर्न ऑस्ट्रेलिया संघाचे कर्णधारपग भूषवत 2021-22 शेफिल्ज शील्ड किताब जिंकला होता. संघ्याच्या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने 1998-99 नंतर या किताबावर नाव कोरले.शॉन मार्शने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 183 सामने खेळले आहेत, यामध्ये त्यामे 41.20 च्या स्ट्राईक रेटने 12 हजार 32 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 32 शतक आणि 58 अर्धशतक ठोकली आहेत.

IPL 2023 च्या ऑक्शनमधून क्रिस वोक्सने घेतली माघार,’हे’ आहे कारण

शॉन मार्शने (Shaun Marsh) शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना जुन 2019 मध्ये खेळला होता. 15 जुनला श्रीलंकेविरूद्ध ओव्हल मैदानात खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यात मार्शने तीन धावा केल्या होत्या. आता त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने क्रिकेट फॅन्सना धक्का बसला आहे.

दरम्यान चार सामन्याच्या टेस्ट मालिकेल 2-1ने टीम इंडिया (Team india) आघाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाने तिसरी टेस्ट जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या WTC च्या फायनलमध्ये स्थान पक्क केले आहे. तर टीम इंडियाला चौथा टेस्ट सामना जिंकावा लागणार आहे. टीम इंडिया जर जिंकली तर ती WTC च्या फायनलसाठी क्वालिफाय होणार आहे. जर टीम इंडियाचा पराभव झाला तर WTCचा प्रवास खडतर असणार आहे.

WPL : पोरींनी पहिल्याच फटक्यात केली कमाल… IPL मध्ये दिग्गजांनाही नव्हतं जमलं

    follow whatsapp