Shubhman Gill Career : 23 वर्षीय शुभमन गिल (Shubhman Gill) यावेळी (Indian Cricket Team Star Batsman ) भारतीय क्रिकेटचा नवा स्टार बनला आहे. कसोटी सामना असो वा टी-२० आणि वनडे क्रिकेट, शुभमन गिलच्या बॅटची ताकद सर्वत्र पाहायला मिळत आहे. टीम इंडिया ज्या स्थित्यंतरातून जात आहे आणि खेळाडूंना भविष्यासाठी तयार केले जात आहे ते पाहता शुभमन गिलच्या सातत्यपूर्ण धावा आणि चांगली कामगिरी भारतीय चाहत्यांच्या आशा उंचावत आहे. Indian star Batsman Shubhman Gill
ADVERTISEMENT
23 वर्षीय शुभमन गिल आता क्रिकेट चाहत्यांचा लाडका होत आहे, त्याने छोट्याशा कारकिर्दीत मोठे नाव कमावले आहे. आता सर्वांना जाणून घ्यायचे आहे की शुभमन गिलची स्टोरी काय आहे. तर आपन 23 वर्षीय शुभमन गिलबद्दल जाणून घेऊया.
100 रुपयांच्या शर्यतीने बनवलं निडर
23 वर्षीय शुभमन गिल आता ज्या पद्धतीने शॉट्स खेळतो, तेव्हा सगळ्यांनाच त्याच्या टेक्निकची खात्री पटते. हे आत्तापासूनचे नाही तर लहानपणापासून आहे, कारण तो कठोर सराव करत असे आणि त्याच्या कुटुंबीयांनीही त्याला खूप साथ दिली. पंजाबमधील फाजिल्का येथून आलेला शुभमन गिल सुरुवातीला तिथे क्रिकेट खेळला, त्याच्या वडिलांनी त्याला खूप मदत केली. शुभमनने स्वतः सांगितले होते की, त्याचे वडील गोलंदाजांना आव्हान देत असत की जो कोणी शुभमनला बाद करेल त्याला 100 रुपयांचे बक्षीस मिळेल.
सारा अली खान क्रिकेटपटू शुभमन गिलला करतेय डेट?
वडिलांना शेती सोडावी लागली
शुभमन गिलच्या म्हणण्यानुसार, त्यांचे कुटुंब पूर्णपणे त्यांच्या शेतीवर अवलंबून होते. पण सगळी शेतं आणि घरं गावातच होती आणि त्याचा सराव चंदिगडमध्येच शक्य होता. मग वडिलांनी मोठा निर्णय घेतला आणि चंदीगडला शिफ्ट झाले. याचा परिणाम शेतीवरही झाला, शुभमनच्या म्हणण्यानुसार, तो आपला सराव सुरू ठेवू शकला, त्यामुळे वडील चंदीगडहून गावी शेतीसाठी यायचे आणि मी तिथे सराव करायचो, असं तो म्हणाला.
युवराज सिंहसोबत आहे स्पेशल बाँड
शुभमन गिल हा पंजाबमधून आला आहे आणि स्टार अष्टपैलू युवराज सिंह देखील पंजाबची शान आहे. अशा परिस्थितीत शुभमन गिल जेव्हा पंजाबकडून देशांतर्गत क्रिकेट खेळत होता, तेव्हा युवराज सिंह आणि हरभजन सिंहसारख्या वरिष्ठ खेळाडूंनी त्याला साथ दिली आणि खूप काही शिकवले. शुभमनने सांगितले होते की लॉकडाऊन दरम्यान युवराज सिंहने त्याला खूप मदत केली, तो त्याच्याकडे जायचा आणि त्याच्यासोबत सराव, जिम आणि इतर गप्पा मारायचा. शुभमनने युवराजचे गुरू म्हणूनही वर्णन केले आहे.
डोमेस्टिक क्रिकेटमध्ये पाडला धावांचा पाऊस
अंडर-19 ते देशांतर्गत क्रिकेटपर्यंत शुभमन गिलने नेहमीच धावांचा पाऊस पाडला आहे, त्याने 40 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 53 च्या सरासरीने 3200 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत, तसेच 76 लिस्ट-ए सामन्यांमध्ये 54.12 च्या सरासरीने 3500 धावा केल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमक दाखवल्यानंतर शुभमन गिलला टीम इंडियात एंट्री मिळाली, आधी छोट्या मालिकेत संधी मिळाली आणि आता तो टीम इंडियाचा मजबूत सलामीवीर बनत आहे.
सारा तेंडुलकरसोबत अफेअरच्या चर्चा
क्रिकेटच्या मैदानावर त्याच्या स्टायलिश फलंदाजीसोबतच २३ वर्षीय शुभमन गिल त्याच्या लूकमुळेही चर्चेत असतो. इन्स्टाग्रामवर त्याचे बरेच फॉलोअर्स आहेत, तरुण चाहतेही त्याचे वेडे आहेत. शुभमन गिलच्या छोट्याशा कारकिर्दीत त्याच्या काही अफेअर्सच्याही चर्चा आहेत. भारतीय क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरसोबतच्या अफेअरबाबत अनेक गोष्टी समोर येत आहेत.
Ind vs NZ: शुभमन गिलची जबरदस्त फलंदाजी; द्विशतक झळकावत बनला नंबर वन!
सारा आणि शुभमन गिलबद्दल अनेकदा सोशल मीडियावर चर्चा होत असते. स्टेडियममध्येही चाहते सारा तेंडुलकरचे नाव घेऊन शुभमन गिलला चिडवत असतात. मात्र, याबाबत दोन्ही बाजूंकडून काहीही सांगण्यात आलेले नाही. केवळ सारा तेंडुलकरच नाही तर अलीकडे शुभमन गिलचे नाव बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानसोबतही जोडले गेले होते.
ADVERTISEMENT