आगामी टी-२० विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचा सामना २४ ऑक्टोबरला रंगणार आहे. संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष या सामन्याकडे असल्यामुळे चाहत्यांमध्येही उत्कंठा आहे. या सामन्याआधीच पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी भारताला डिवचलं आहे. भारताकडे बाबर आझमच्या संघासारखे गुणवान खेळाडू नसल्यामुळेच ते पाकिस्तानसोबत क्रिकेट मालिका खेळत नाहीत असं वक्तव्य माजी क्रिकेटपटू अब्दुल रझाकने केलं आहे.
ADVERTISEMENT
पाकिस्तानच्या ARY News या वाहिनीवर एका कार्यक्रमात बोलत असताना रझाकने हे वक्तव्य केलं आहे. भारताकडे पाकिस्तानच्या तुलनेत त्या पद्धतीचे बॉलर आणि ऑल राऊंडर आहेत असा प्रश्न रझाकला विचारण्यात आला. ज्याला उत्तर देताना रझाक म्हणाला, “मला वाटत नाही भारत पाकिस्तानचा सामना करु शकेल. पाकिस्तानकडे ज्या पद्धतीचं टॅलेंट आहे ते भारताकडे नाही. म्हणूनच ते आपल्यासोबत मालिका खेळत नाहीत.”
T-20 World Cup : पाकिस्तान वठणीवर, अधिकृत जर्सीवर लिहीलं भारताचं नाव
भारताचा संघही चांगला आहे, मला त्याबद्दल काहीही म्हणायचं नाही. त्यांच्या संघातही चांगले खेळाडू आहे. पण जर तुम्ही दोन्ही संघातील खेळाडूंचं टॅलेंट बघायला गेलात तर आपल्याकडे असे अनेक दिग्गज खेळाडू होऊन गेले की ज्यांच्याशी स्पर्धा करणं भारताला जमलं नाही असं रझाक म्हणाला. पाकिस्तानने प्रत्येक दशकात चांगले खेळाडू दिले आहेत, म्हणून भारतीय संघ पाकिस्तानसोबत खेळत नाही, असं रझाकने स्पष्ट केलं.
T-20 World Cup : तो आला आणि कामालाही लागला, मेंटॉर धोनीला नव्या रुपात पाहिलंत का?
ADVERTISEMENT