T20 WC : मोहम्मद शमीला ट्रोल करणाऱ्यांवर विराट कोहली भडकला!

मुंबई तक

• 11:33 AM • 30 Oct 2021

पाकिस्तानकडून झालेला पराभव विसरून उद्या भारतीय संघ पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेत उद्या (31 ऑक्टोबर) भारताचा सामना न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्याने गोलंदाज मोहम्मद शमीला ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं. भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं. या […]

Mumbaitak
follow google news

पाकिस्तानकडून झालेला पराभव विसरून उद्या भारतीय संघ पुन्हा एकदा मैदानात उतरणार आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेत उद्या (31 ऑक्टोबर) भारताचा सामना न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्याने गोलंदाज मोहम्मद शमीला ट्रोल करणाऱ्यांना सुनावलं.

हे वाचलं का?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं. या पराभवानंतर भारतीय संघातील गोलंदाज मोहम्मद शमी याला त्याच्या धर्मावरून ट्रोल करण्यात आलं होतं. मोहम्मद शमीला ट्रोल करण्याच्या मुद्द्यावरून विराट कोहली भडकला.

T20 World Cup : हार्दिक की शार्दुल? न्यूझीलंडविरुद्ध सामन्याआधी विराट कोहलीसमोर यक्षप्रश्न

विराट कोहली म्हणाला, ‘काही लोक स्वतःची ओळख लपवून अशा पद्धतीचं कृत्य करतात. आजघडीला हे नेहमीचंच झालं आहे. जेव्हा ते कुणाला अशा पद्धतीने त्रास देत असतात, तेव्हा ते त्यांच्या आयुष्यातील खालचा स्तर जातात. आम्ही ड्रेसिंग रुमचं वातावरण चांगलं ठेवतो आणि सर्व खेळाडूंना सोबत ठेवतो’, असं कोहली म्हणाला.

‘मोहम्मद शमीच्या ह्रदयात देशप्रेमाचं वेड आहे, पण ते त्यांना समजत नाही याचंच दुःख वाटतं. माझ्या आयुष्यात अशा लोकांसाठी कोणतंही स्थान नाही. भारतीय संघ आपल्या आघाडीच्या गोलंदाजासोबत आहे आणि 200 टक्के त्याच्या पाठिशी आहे’, असंही कोहलीनं यावेळी सांगितलं.

मुलगी तापाने फणफणत असतानाही शमी मैदानात उतरला, ६ विकेट घेत संघाला सामना जिंकवून दिला

‘कोणत्याही व्यक्तीवर त्याच्या धर्मावरून टीका करणं सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, पण मी कधीच कुणासोबत अशा पद्धतीने भेदभाव केला नाही. काही लोकांना फक्त हेच काम आहे. जर कुणाला मोहम्मद शमीच्या खेळात पॅशन दिसत नसेल, तर मग मी माझा वेळ वाया घालवू इच्छित नाही’, अशा शब्दात कोहलीने शमीला ट्रोल करणाऱ्यांना उत्तर दिलं.

हार्दिक पंड्या फीट

उद्या होणाऱ्या सामन्यासाठी हार्दिक पंड्या फीट असल्याची माहिती विराट कोहलीने दिली. सहाव्या गोलंदाजाची गरज पडल्यास हार्दिक पंड्या गोलंदाजी करेन किंवा मी स्वतः गोलंदाजी करेन असंही कोहली म्हणाला. शार्दुल ठाकूर आमच्या व्युहरचनेत आहे. मात्र परिस्थितीनुसार अंतिम 11 खेळाडू बद्दल निर्णय घेतला जाईल.

    follow whatsapp