Indian Cricket | Chetan Sharma Sting operation :
ADVERTISEMENT
भारतीय टीमशी (Team India) संबंधित एका बातमीमुळे संपूर्ण क्रिकेट (Cricket) विश्वात खळबळ उडाली आहे. आपल्या सर्वांचे आवडते खेळाडू जीममध्ये व्यायाम करुन किंवा पौष्टिक आहार घेत फिट राहत असल्याचं आपण मानतो. फिटनेससाठीची यो यो टेस्ट पास होणं हेही एक कठीण काम समजलं जातं. मात्र अनेक खेळाडू एवढे फिट असतात की ही टेस्ट ते अगदी सहज पास होतात. तर मैदानावर धावा बनवणाऱ्या काही खेळाडूंना केवळ यो यो टेस्ट पास नसल्यामुळे टीम पासून लांब ठेवलं जातं. (sting operation on the Chairman of the Selection Committee of the Board of Control for Cricket in India (BCCI), Chetan Sharma)
मात्र भारतीय क्रिकेटर्स फिट असल्याचं दाखविण्यासाठी इंजेक्शन्स घेत असल्याचा मोठा दावा निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा यांनी केला आहे. ‘झी’ वृत्तवाहिनीच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये त्यांनी हा दावा केला आहे. शर्मा यांच्या या कथित स्टिंग ऑपरेशननंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. याशिवाय सोशल मीडियावरही क्रिकेट फॅन्स संताप व्यक्त करु लागले आहेत. तसंच यामुळे इतर खेळांप्रमाणे आता क्रिकेटपर्यंतही डोपिंगची कीड पसरली आहे का? असा सवाल आता विचारला जात आहे.
WPL Auction 2023: नीता अंबांनींसह दिग्गजांची हजेरी, लिलावाला कोण आलेलं?
या कथित स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे, भारतीय क्रिकेटर्स इंजेक्शन घेतात. हे इंजेक्शन डोपिंग टेस्टमध्ये पकडलं जातं नाही. पण यामुळे ८० टक्के फिट असलेला खेळाडू १०० टक्के फिट ठरतो. हे कोणतही पेन किलर नाही. मात्र या इंजेक्शनमध्ये एक असं औषध असतं जे डोपिंग टेस्टमध्ये पकडलं जातं नाही. याशिवाय या खेळाडूंचे बाहेर त्यांचे स्वतःचे डॉक्टर्स आहेत, तेच त्यांना या औषधांचा डोस पुरवतात. यामुळे एखाद्या महत्वाच्या मालिकेपूर्वी या खेळाडूंना फिट असल्याचं दाखवणं सोपं जातं.
-
काही स्टार खेळाडूंना पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही राष्ट्रीय क्रिकेट अकादमीकडून ग्रीन सिग्नल दिला जातो आणि त्यानंतर निवडकर्त्यांना निवडीबाबत अंतिम निर्णय घेण्यास सांगितलं जातं.
-
बुमराहची दुखापत इतकी गंभीर आहे की, ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषक स्पर्धेत त्याने एकही सामना खेळला असता तर तो किमान वर्षभर बाहेर राहिला असता.
-
हार्दिक पांड्या माझ्या घरी येतो. रोहित शर्मा अर्धा तास माझ्याशी बोलतो. उमेश यादवही येतो. अनेक क्रिकेटपटूंना त्यांच्या करिअरला धोका असल्याचं वाटतं. त्यांना एकाच फॉरमॅटमध्ये संधी मिळवायची आहे.
-
ईशान किशनमुळे 3 खेळाडूंचे संघातील स्थान धोक्यात आलं आहे. शिखर धवन, संजू सॅमसन, केएल राहुल.
-
विराट कोहली आणि सौरभ गांगुली यांच्यामध्ये मोठे मतभेद होते. हे मतभेद सर्वश्रेष्ठ कर्णधार कोण? यावरुन होते.
WPL 2023 Auction: महिला क्रिकेटचा नवीन अध्याय; WPL साठी आज लिलाव
बुमराहची दुखापत गंभीर :
जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बराच काळ संघाबाहेर आहे. जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर त्याला दुखापत झाली होती. T20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने एक टी-20 सामना खेळला होता. यानंतर तो पुन्हा जखमी झाला. त्याच्या दुखापतीबाबत चेतन शर्मा म्हणाले की जसप्रीत बुमराहची दुखापत इतकी गंभीर आहे की जर त्याने टी-२० विश्वचषकात आणखी एकही सामना खेळला असता तर तो एक वर्षासाठी बाहेर गेला असता. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषकात बुमराह खेळला नव्हता.
ADVERTISEMENT