बटलर-बेअरस्टो जोडीचा टीम इंडियाला दणका, भारताचा पराभव

मुंबई तक

• 05:34 PM • 16 Mar 2021

जोस बटलर आणि जॉनी बेअरस्टो जोडीने केलेल्या धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतावर ८ विकेट राखून मात केली आहे. भारताने विजयासाठी दिलेलं १५७ रन्सचं टार्गेट इंग्लंडने जोस बटलरच्या नॉट आऊट ८३ आणि बेअरस्टोच्या नॉट आऊट ४० रन्सच्या इनिंगच्या जोरावर पूर्ण केलं. कॅप्टन विराट कोहलीची इनिंग वगळता सर्व क्षेत्रात भारतीय प्लेअर्स आज कमी पडले. […]

Mumbaitak
follow google news

जोस बटलर आणि जॉनी बेअरस्टो जोडीने केलेल्या धडाकेबाज फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडने तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतावर ८ विकेट राखून मात केली आहे. भारताने विजयासाठी दिलेलं १५७ रन्सचं टार्गेट इंग्लंडने जोस बटलरच्या नॉट आऊट ८३ आणि बेअरस्टोच्या नॉट आऊट ४० रन्सच्या इनिंगच्या जोरावर पूर्ण केलं. कॅप्टन विराट कोहलीची इनिंग वगळता सर्व क्षेत्रात भारतीय प्लेअर्स आज कमी पडले.

हे वाचलं का?

टॉस जिंकून इंग्लंडने पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतला. सलग तिसऱ्या सामन्यात लोकेश राहुलला स्वस्तात माघारी धाडण्यात इंग्लंडला यश आलं. रोहित शर्मा आणि इशान किशनही यानंतर स्वस्तात माघारी परतले. अखेरीस विराट कोहलीने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळत ऋषभ पंतच्या साथीने संघाचा डाव सावरला. परंतू अखेरच्या फळीतील बॅट्समनची योग्य साथ न लाभल्यामुळे विराटचे प्रयत्न तोकडे पडले. ४६ बॉलमध्ये ८ फोर आणि ४ सिक्स लगावत विराटने नॉटआऊट ७७ रन्सची इनिंग खेळली. इंग्लंडकडून मार्क वुडने ३ तर ख्रिस जॉर्डनने २ विकेट घेतल्या.

प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने सावध सुरुवात केली. चहलने जेसन रॉयला आऊट करत भारताला यश मिळवून दिलं. परंतू दुसऱ्या बाजूने जोस बटलरच्या फटकेबाजीवर नियंत्रण ठेवण्यात भारतीय बॉलर्स अपयशी ठरले. वॉशिंग्टन सुंदरने मलानला आऊट करत चांगली झुंज दिली. पण यानंतर मैदानावर आलेल्या बेअरस्टोने बटलरला चांगली साथ देत भारताच्या विजयाच्या आशेवर पाणी फिरवलं. बटलरने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत ५२ बॉलमध्ये ५ फोर आणि ४ सिक्स लगावत नॉटआऊट ८३ रन्सची इनिंग खेळली.

    follow whatsapp