IND vs BAN: भारताचा हुकमी एक्काच! रोहित शर्माचा मोठा कारनामा, विराट कोहलीचा विक्रम मोडला

मुंबई तक

02 Oct 2024 (अपडेटेड: 02 Oct 2024, 12:33 PM)

Rohit Sharma Break Virat Kohli Captaincy Record : भारताने बांगलादेश विरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही दणदणीत विजय मिळवला. कानपूरमध्ये रंगलेल्या या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशला 146 धावांवर गारद करून 2-0 ने विजय मिळवला.

Rohit Sharma Break Virat Kohli WTC Captaincy Record

Virat Kohli WTC Captaincy Record History

follow google news

बातम्या हायलाइट

point

रोहित शर्माच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद

point

रोहित शर्माने विराट कोहलीचा 'तो' विक्रम मोडला

point

बांगलादेश विरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटीतही भारताचा दणदणीत विजय

Rohit Sharma Break Virat Kohli Captaincy Record : भारताने बांगलादेश विरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही दणदणीत विजय मिळवला. कानपूरमध्ये रंगलेल्या या कसोटी सामन्यात भारताने बांगलादेशला 146 धावांवर गारद करून 2-0 ने विजय मिळवला. पहिल्या इनिंगमध्ये 52 धावांचा लीड घेणाऱ्या भारताला बांगलादेशवर विजय मिळवण्यासाठी 95 धावांची आवश्यकता होती. भारताने 3 विकेट्स गमावून धावांचं लक्ष्य गाठलं आणि या सामन्यात विजयी झेंडा फडकवला.

हे वाचलं का?

या विजयामुळे जागतिक कसोटी क्रिकेच्या क्रमवारीत अव्वल स्थानी असलेला भारताचा संघ 11 सामन्यांमध्ये 8 विजय, दोन पराभव आणि एक ड्रॉ सामन्यामुळं 98 अंकांवर आहे. ऑस्ट्रेलियाने 12 सामन्यांमध्ये 8 विजय, तीन पराभव आणि एक ड्रॉ सामन्यामुळे 62.50 गुणांमुळे दुसऱ्या स्थानी आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्त्वात आतापर्यंत 18 सामन्यांपैकी 12 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

हे ही वाचा >>Ladki Bahin Yojana: 'या' महिलांना मिळणार नाहीत लाडकी बहीण योजनेचे 4500! नियम काय आहे?

त्यामुळे रोहित शर्माने सर्वात कमी सामन्यांमध्ये कॅप्टन्सी करून सर्वाधिक 66.66 टक्के विजय मिळवून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या इतिहासात पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. बांगलादेश विरुद्ध मालिका विजय मिळवल्यानंतर रोहित शर्माने डब्ल्यूटीसीच्या इतिहासात नवीन विक्रमाला गवसणी घातली आहे. रोहित शर्माने विराट कोहलीचा डब्ल्यूटीसीमध्ये असलेला विक्रम मोडला आहे.

विराट कोहलीने कर्णधार म्हणून 63.63 टक्के सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. कर्णधार रोहित शर्माने WTC च्या इतिहासात सर्वाधिक विजय मिळवून पहिल्या स्थानावर उडी घेतली आहे. याचसोबत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्सही रोहितच्या या विक्रमाजवळ आहेत.

हे ही वाचा >> Kolhapur Crime: मुलाने केली आईची हत्या! हृदय, लिव्हर, मेंदूला मीठ मसाला लावून खाल्लं, कोर्टाने सुनावली सर्वात भयंकर शिक्षा

WTC इतिहासात कर्णधार म्हणून सर्वाधिक विजय (कमीत कमी 10 कसोटी सामन्यांमध्ये कॅप्टन्सी)

66.66 - रोहित शर्मा (18 कसोटीत 12 विजय)
63.73 - विराट कोहली (22 कसोटीत 14 विजय)
62.50 - बेन स्टोक्स (24 कसोटीत 15 विजय)
पॅट कमिन्स (28 कसोटीत 17 विजय)
57.14 - टीम पेन (14 कसोटीत 8 विजय)

    follow whatsapp