Rohit Sharma, India vs New Zealand, 3rd Test: न्यूझीलंडने तिसऱ्या कसोटी सामन्यातही भारताचा दारुण पराभव केला. न्यूझीलंडने या सामन्यात 25 धावांनी विजय मिळवून 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-0 ने आघाडी घेतली. मागील 24 वर्षात पहिल्यांदाच भारतीय संघाला टेस्ट क्रिकेटमध्ये घरच्या मैदानातच क्लिन स्वीप व्हावं लागलं. सामना संपल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली.
ADVERTISEMENT
रोहितने हर्षा भोगले यांच्या प्रश्नांना उत्तर देताना म्हटलं, "टेस्ट मॅच आणि सीरिजमध्ये पराभवं होणं, ही मनाला चटका देणारी गोष्ट आहे. आम्ही या कसोटी मालिकेच चांगली कामगिरी केली नाही, हे आम्हाला माहित आहे. न्यूझीलंडने नेहमीच चांगलं क्रिकेट खेळलं. सामन्यादरम्यान आमच्याकडून खूप चुका झाल्या. सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात मोठी धावसंख्या उभी करू शकलो नाही. आजच्या सामन्यात आम्ही धावंसख्येचा पाठलाग यशस्वीपणे करू शकलो असतो. परंतु, एक संघ म्हणून आम्ही अपयशी ठरलो.
हे ही वाचा >> ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना मिळालं 'दिवाळी गिफ्ट'! उपमुख्यमंत्र्यांनी योजनेबाबत केली मोठी घोषणा
रोहित शर्मा पुढे म्हणाला, जेव्हा मी फलंदाजीसाठी मैदानात उतरतो, तेव्हा माझ्याकडे एक प्लॅन असतो. पण या मालिकेत आम्हाला अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही. यामुळे मला खूप दु:ख झालं. रिषभ पंत आणि वॉशिंग्टन सुंदरने दाखवून दिलं की, अशा परिस्थितीत कशाप्रकारे फलंदाजी केली पाहिजे. परंतु, या मालिकेत आमचे सर्व प्रयत्न फोल ठरले. एक कर्णधार आणि फलंदाज म्हणूनही माझी कामगिरी चांगली राहिली नाही. मालिकेत आमच्या सर्वांचा खेळ चांगला नव्हता.
हे ही वाचा >> Manoj Jarange : जरांगेंनी घोषित केल्या जागा; 'या' दोन जिल्ह्यात शिलेदार तयार, दानवेंच्या लेकालाही भिडणार?
सहा इनिंगमध्ये रोहितने केल्या अवघ्या 91 धावा
रोहित शर्माने न्युझीलंड विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात सुमार कामगिरी केली. रोहितने एकूण सहा इनिंगमध्ये फलंदाजी केली. यात फक्त एका अर्धशतकाचा समावेश असून रोहितने एकूण 91 धावा केल्या आहेत. तसच तो काही इनिंगमध्ये शून्यावरही बाद झाला.
ADVERTISEMENT