Ind vs Nz, CT Final 2025 : अतितटीच्या फायनलमध्ये भारत बनला 'चॅम्पियन'! रोहितने ठोकलं वादळी अर्धशतक, न्यूझीलंडचा दारुण पराभव

India vs New Zealand, ICC Champions Trophy Final : दुबईत रंगलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा धुव्वा उडवून विजयाचा झेंडा फडकवला.

India wins Against New Zealand

India wins Against New Zealand

नरेश शेंडे

09 Mar 2025 (अपडेटेड: 09 Mar 2025, 10:06 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

न्यूझीलंड विरुद्ध भारताचा दणदणीत विजय

point

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फायनलचा सामना जिंकला

point

रोहित शर्माने ठोकलं वादळी अर्धशतक

India vs New Zealand, ICC Champions Trophy Final : दुबईत रंगलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा धुव्वा उडवून विजयाचा झेंडा फडकवला. कर्णधार रोहित शर्माने धडाकेबाज फलंदाजी करून 76 धावांची अर्धशतकी खेळी केली. 252 धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. शुबमन गिल आणि रोहित शर्माने आक्रमक सुरुवात केल्यानंतर मधल्या फळीत श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने संघाची कमान सांभाळली. हार्दिक पंड्याने महत्त्वपूर्ण 18 धावांची खेळी केली. के एल राहूलने भारताला विजयाच्या दिशेनं नेत 34 धावांची नाबाद खेळी केली. तर रविंद्र जडेजाने चौकार ठोकून भारताला विजय मिळवून दिला. भारताने 6 विकेट्स गमावून 256 धावा करून चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये रोमहर्षक विजय मिळवला.

हे वाचलं का?

भारतासाठी रोहित शर्माने पॉवर प्ले मध्ये चौकार-षटकारांचा पाऊस पाडून 76 धावा कुटल्या. भारताचा धावांचा आलेख वाढवण्यात शुबमन गिलनेही 31 धावांचं योगदान दिलं. परंतु, विराट कोहली फक्त 1 धावेवर बाद झाल्याने स्वस्तात माघारी परतावं लागलं. त्यानंतर श्रेयस अय्यर (48) आणि अक्षर पटेलने (29) सावध खेळी करून भारताच्या धावसंख्येत वाढ केली.

हे ही  वाचा >> बाळा नांदगावकरांनी कुंभमेळ्यातून आणलेलं गंगेचं पाणी Raj Thackeray का प्यायले नाहीत? कारण वाचून लोटपोट हसाल

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीला उतरलेल्या विल यंगने (15), रचिन रविंद्रने (37), केन विलियमसन (11), डॅरी मिचेल (63), टॉम लेथम (14), ग्लेन फिलिप्स (34), तर मायकल ब्रेसवेलने 53 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. तर भारतासाठी मोहम्मद शमीने (1), वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादवने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. तर रविंद्र जडेजालाही एका विकेटवर समाधान मानावं लागलं. 

हे ही वाचा >> Pune: भर चौकात नको ते करणाऱ्या गौरव अहुजाची कुंडलीच आली समोर, हा तर...

दरम्यान रचिन रविंद्रने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला 76 धावांवर असताना तंबूत पाठवलं. तर मिचेल सँटनरने शुबमन गिल (31) आणि श्रेयस अय्यरला 48 धावांवर पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तसच ब्रेसवेलने विराट कोहली (1) आणि अक्षर पटेलला 29 धावांवर बाद करून भारताला मोठा धक्का दिला. 

    follow whatsapp