Wrestling Federation of India Suspended : भारतीय कुस्ती महासंघाच्या निवडणुकीनंतर पुन्हा वादाची दंगल सुरू झाली आहे. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या जवळच्या व्यक्तीची वर्णी कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी लागल्याने कुस्तीपटू साक्षी मलिकने सन्यास घेतला. यावरून राजकारण तापल्यानंतर मोदी सरकारने तडकाफडकी कुस्ती महासंघ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. हे पाऊल डॅमेल कंट्रोल असल्याचे विरोधकांकडून म्हटले जात आहे.
ADVERTISEMENT
भारतीय कुस्ती संघटनेच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या, ज्यामध्ये भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह विजयी झाले आणि कुस्तीपटू अनिता शेओरान यांचा पराभव झाला. यानंतर महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती घेतली. हा मुद्दा सरकारवर बुमरॅग झाल्याचे समोर आले, त्यानंतर नवी कुस्ती संघटना निलंबित करण्यात आली आहे.
संजय सिंह यांनी घेतलेले निर्णय रद्द
कुस्ती संघटना रद्द करतानाच क्रीडा मंत्रालयाने संजय सिंह यांनी घेतलेल्या सर्व निर्णयांना स्थगितीही दिली आहे. यासोबतच पुढील आदेश येईपर्यंत सर्व कामांवर बंदी घालण्यात आली आहे.
हेही वाचा >> “गौतम अदानींचं नाव घ्यावं लागेल, त्यांनी 25 कोटींचा चेक पाठवला”, शरद पवारांनी मानले आभार
क्रीडा मंत्रालयाच्या कारवाईबाबत बजरंग पुनिया म्हणाला की, ‘मला अद्याप याबाबत माहिती नाही. जर हा निर्णय घेतला असेल तर तो अगदी योग्य आहे. जे आपल्या बहिणी आणि मुलींच्या बाबतीत घडत आहे. अशा लोकांना सर्व महासंघातून काढून टाकले पाहिजे.’
साक्षी मलिकने व्यक्त केली होती चिंता
अलीकडेच, कुस्ती संघटनेने ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिपची घोषणा केली होती, ज्यामध्ये ही स्पर्धा 28 डिसेंबरपासून उत्तर प्रदेशातील गोंडा येथे सुरू होणार होती. कुस्तीतून सन्यास घेतलेल्या साक्षी मलिकने याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. ती म्हणालेली की, ‘मी कुस्ती सोडली आहे, पण काल रात्रीपासून मला काळजी वाटत आहे. ज्युनियर महिला कुस्तीपटू मला फोन करून सांगत आहेत की 28 तारखेपासून ज्युनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा होणार आहे आणि ही स्पर्धा नंदनी नगर गोंडा येथे आयोजित करण्याचा निर्णय नवीन कुस्ती महासंघाने घेतला आहे.’
हेही वाचा >> “ते दरोडेखोर आम्हाला…”, CM एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर बरसले
साक्षी मलिकने तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिले आहे की, ‘गोंडा हे ब्रिजभूषण यांचे वर्चस्व असलेले क्षेत्र आहे. आता कल्पना करा कोणत्या वातावरणात ज्युनियर महिला कुस्तीपटू तिथे कुस्ती खेळण्यासाठी जातील. या देशात नंदनी नगर व्यतिरिक्त कुठेही राष्ट्रीय खेळाडूंना ठेवण्यासाठी जागा नाही का? ? समजून घ्या. मला काय करावं कळत नाहीये.’
ADVERTISEMENT
