Tokyo Olympic 2020 : P.V.Sindhu ची उपांत्यपूर्व फेरीत धडक, डेन्मार्कच्या खेळाडूवर मात

मुंबई तक

• 02:57 AM • 29 Jul 2021

भारताची आघाडीची बॅडमिंटनपूट पी.व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्ड्टवर दोन सेटमध्ये सरळ मात करत सिंधूने बॅडमिंटनमध्ये पदकाची आशा कायम ठेवली आहे. अवघ्या ४१ मिनीटांत संपलेल्या या सामन्यात सिंधूने २१-१५, २१-१३ अशी बाजी मारली. आगामी फेरीत सिंधूसमोरचं आव्हान खडतर असणार आहे. जपानच्या अकाने यामागुची आणि कोरियाच्या किम गेउन यांच्यातील […]

Mumbaitak
follow google news

भारताची आघाडीची बॅडमिंटनपूट पी.व्ही. सिंधूने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्ड्टवर दोन सेटमध्ये सरळ मात करत सिंधूने बॅडमिंटनमध्ये पदकाची आशा कायम ठेवली आहे. अवघ्या ४१ मिनीटांत संपलेल्या या सामन्यात सिंधूने २१-१५, २१-१३ अशी बाजी मारली.

हे वाचलं का?

आगामी फेरीत सिंधूसमोरचं आव्हान खडतर असणार आहे. जपानच्या अकाने यामागुची आणि कोरियाच्या किम गेउन यांच्यातील विजेत्या खेळाडूशी सिंधूला दोन हात करायचे आहेत. “पहिल्या सेटमध्ये मी चांगली सुरुवात केली. परंतू १५-१६ पॉईंटच्या दरम्यान मी काही डिफेन्सवर लक्ष करत असल्यामुळे काही गूण बहाल केले. माझ्या कोचने मला लगेचच मी चुकीच्या पद्धतीने खेळत असल्याचं सांगितलं. यानंतर मी लगेचच माझी रणनिती बदलत पहिला सेट जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये मला फारसा त्रास झाला नाही.” सामना संपल्यानंतर सिंधूने आपली प्रतिक्रिया दिली.

संपूर्ण सामन्यावर सिंधूचं वर्चस्व पहायला मिळालं. ड्रॉप, स्मॅश अशा चांगल्या फटक्यांचा वापर करत सिंधूने आपल्या प्रतिस्पर्ध्याला कायम बॅकफूटवर ठेवलं. संपूर्ण सामन्यात डेन्मार्कची मिया दबावाखाली खेळताना आढळली. मधल्या काळात मियाने चांगलं कमबॅक केलं होतं, परंतू आपल्या खेळात सातत्य राखणं तिला जमलं नाही.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे जास्त बॅडमिंटनपटू पात्र ठरु शकले नाहीत. पुरुष एकेरीत साई प्रणीतने निराशाजनक कामगिरी करत सर्वांची निराशा केली. पुरुष दुहेरीतही सात्विकसाईराज आणि चिराग जोडीचं आव्हान संपुष्टात आलं. त्यामुळे सिंधूच्या रुपाने बॅडमिंटनमध्ये भारताची एकमेश आशा कायम आहे.

    follow whatsapp