Tokyo Paralympics : भारताच्या खात्यात आणखी एक पदक, नेमबाजीत सिंघराजला कांस्यपदक

मुंबई तक

• 09:24 AM • 31 Aug 2021

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने पदकांची लयलूट सुरु ठेवली आहे. पुरुषांच्या १० मी. एअर पिस्तुल P1 प्रकारात भारताच्या सिंघराजने कांस्यपदकाची कमाई केली आहे. अंतिम फेरीत सिंघराजने २१६.८ गुण मिळवत तिसऱ्या स्थानावर आपलं नाव पक्क करत पदक जिंकलं. त्याआधी ८ जणांच्या पात्रता फेरीत सिंघराजने सहावं स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. सिंघराजने मिळवलेलं हे पदक टोकियो […]

Mumbaitak
follow google news

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने पदकांची लयलूट सुरु ठेवली आहे. पुरुषांच्या १० मी. एअर पिस्तुल P1 प्रकारात भारताच्या सिंघराजने कांस्यपदकाची कमाई केली आहे. अंतिम फेरीत सिंघराजने २१६.८ गुण मिळवत तिसऱ्या स्थानावर आपलं नाव पक्क करत पदक जिंकलं. त्याआधी ८ जणांच्या पात्रता फेरीत सिंघराजने सहावं स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता.

हे वाचलं का?

सिंघराजने मिळवलेलं हे पदक टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेतलं भारताचं आठवं पदक ठरलं आहे. रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने ४ पदकं मिळवली होती. भारताच्या सिंघराजने पदकाची कमाई केली असली तरीही याच गटात मनिष नरवालला निराशेचा सामना करावा लागला. पात्रता फेरीत पहिलं स्थान मिळवलेल्या मनिष नरवालला अंतिम फेरीत सातव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

अंतिम फेरीत सिंघराजने सुरुवातीपासून पहिल्या ३ स्थानांसाठी प्रयत्न सुरु ठेवले होते. १९ व्या संधीत खराब कामगिरीनंतर सिंघराज मागे फेकला गेला होता, परंतू त्याने वेळेत कमबॅक करुन पदकांच्या शर्यतीत आपलं नाव कायम ठेवलं. २० व्या संधीत सिंघराजने पुन्हा एकदा कमाल करुन दाखवली. चीनच्या चाओ यांगने गोल्ड तर चीनच्याच हुआंग झिंगने सिल्वर मेडल मिळवलं.

त्याआधी महिला नेमबाजीत भारताच्या रुबिना फ्रान्सिसचं आव्हान अंतिम फेरीत संपुष्टात आलं.

    follow whatsapp