T20 World Cup: पाकिस्तानचा झाला करेक्ट कार्यक्रम! अमेरिकेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

रोहिणी ठोंबरे

15 Jun 2024 (अपडेटेड: 15 Jun 2024, 05:20 PM)

USA vs IRE Highlights : भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असणारा पाकिस्तानी संघ आता T20 विश्वचषकातून बाहेर झाला आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) आणि आयर्लंड यांच्यात शुक्रवारी (14 जून) सामना होणार होता, जो पावसामुळे रद्द झाला.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम

point

सुपर-8 मध्ये भारताने आधीच मिळवलंय स्थान

T20 World Cup 2024, USA vs IRE Highlights : भारताचा कट्टर प्रतिस्पर्धी असणारा पाकिस्तानी संघ आता T20 विश्वचषकातून बाहेर झाला आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका (USA) आणि आयर्लंड यांच्यात शुक्रवारी (14 जून) सामना होणार होता, जो पावसामुळे रद्द झाला. सामना रद्द झाल्याने अमेरिकन संघाने सुपर 8 मध्ये एन्ट्री केली आहे. तर पाकिस्तान संघ बाहेर झाला आहे. एवढंच नाही तर पाकिस्तानसह कॅनडा आणि आयर्लंडचे संघही सुपर 8 च्या शर्यतीतून पूर्णपणे बाहेर पडले आहेत. (usa vs ire match usa team is in super 8 pakistani team out of t20 world cup 2024 )

हे वाचलं का?

हा सामना फ्लोरिडा येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियमवर होणार होता. पण, पावसामुळे मैदानाची परिस्थिती इतकी खराब झाली की सामन्यापूर्वी टॉसही झाले नाही. सुपर 8 मध्ये पोहोचणारा अमेरिका हा सहावा संघ आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान हे संघ आधीच प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत. म्हणजेच आतापर्यंत सहा संघ सुपर 8 मध्ये पोहोचले आहेत आणि फक्त दोन स्पॉट्स बाकी आहेत.
 

हेही वाचा: शरद पवारांनी PM मोदींना डिवचलं, ''विधानसभेतही महाराष्ट्रात सभा...''

पाकिस्तानचा करेक्ट कार्यक्रम

अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातील सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण मिळाला आहे. अशा परिस्थितीत अमेरिकन संघ 5 गुण मिळवत सुपर-8 साठी पात्र ठरला. आता 16 जूनला आयर्लंडविरुद्धचा शेवटचा सामना पाकिस्तानी संघाने जिंकला तरी त्यांना केवळ 4 गुणच मिळवता येतील. त्यामुळे त्यांना सुपर-8 मध्ये स्थान मिळवता येणार नाही.

हेही वाचा: 'मंगळसूत्र, वोट जिहाद अन् नरेटिव्ह...', ठाकरेंनी चढवला PM मोदींवर हल्ला

 

सुपर-8 मध्ये भारताने आधीच मिळवलंय स्थान

सध्या भारतीय संघ ए ग्रुपमधील पॉइंट टेबलमध्ये 6 गुणांसह अव्वल स्थानावर असून सुपर ८ साठी पात्र ठरला आहे. तर अमेरिकन संघ 5 गुणांसह दुसऱ्या स्थानावर असून त्याने सुपर 8 मध्ये स्थान मिळवलं आहे. अमेरिकेने पाकिस्तान आणि कॅनडाचा पराभव केला होता, तर भारताच्या हातून त्यांचा पराभव झाला होता. पाकिस्तान संघ 2 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. यानंतर कॅनडा आणि आयर्लंड संघ चौथ्या-पाचव्या स्थानवर आहे.

हेही वाचा: शीना बोरा हत्याकांडात मोठा ट्विस्ट, जप्त केलेली हाडे आणि अवशेष गायब

 

पावसामुळे अमेरिका-आयर्लंड सामना उशीरा सुरू झाला. 10 वाजेपर्यंत खेळपट्टीची पाहणीच सुरू होती आणि रेफरींनी 11.46 वाजता मॅच सुरू होणार असल्याचे जाहीर केले. यामुळे सर्वांच्या आशा उंचावल्या. मात्र काही वेळाने पाऊस सुरू झाला. यानंतर पंच आणि सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी सामना रद्द झाल्याचे जाहीर केले. 
 

    follow whatsapp