टीम इंडियाचा कर्णधार आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरी नुकतंच चिमुकलीचं आगमन झालं होतं. तर आज या दोघांनीही त्यांच्या मुलीचं नाव ठेवलंय. अनुष्का शर्माने सोशल मिडीयाच्या माध्यमातून चाहत्यांना त्यांच्या मुलीचं नाव सांगितलं. अनुष्का आणि विराटने त्यांच्या मुलीचं नाव ‘वामिका’ असं ठेवलं आहे.
ADVERTISEMENT
अनुष्काने सोशल मिडीयावर ती, विराट आणि मुलीचा फोटो शेअर करत पोस्ट लिहीलीये. ती म्हणते, आम्ही प्रेमाने एकत्र राहिलो, ‘वामिका’च्या आगमनाने आमच्या प्रेम आणि विश्वासाला एक नवीन स्थान प्राप्त झालंय. अगदी काही मिनिटांमध्ये अश्रू, आनंद, चिंता आणि सुख याची जाणीव झाली आहे. आमची झोप उडाली मात्र आमचं मन फार खुश आहे. तुमच्याकडून आलेल्या प्रेम आणि प्रार्थनांसाठी धन्यवाद.
विराट आणि अनुष्काने ठेवलेलं मुलीचं नाव फार खास आहे. ‘वामिका’ हे नाव विराट आणि अनुष्का यांच्या दोघांच्याही नावावरून ठेवण्यात आलं आहे. यामध्ये विराटचा ‘व’ आणि अनुष्काचा ‘का’ यांचा समावेश आहे. ‘वामिका’ या नावाचा अर्थ देवी दुर्गा असा होता. ‘वामिका’ हे दुर्गा देवीच्या नावाचं विशेषण आहे.
जानेवारीमध्ये अनुष्काने मुलीला जन्म दिला होता. मुलगी झाल्याची बातमी देखील दोघांनी सोशल मिडीयाद्वारे सर्वांना सांगितली होती. त्यावेळी विराट आणि अनुष्काने आम्हाला प्राव्हर्सी हवं असल्याचं सांगितलं होतं. शिवाय फोटोग्राफर्सना देखील फोटो न काढण्याची विनंती केली होती.
ADVERTISEMENT