ind vs aus 2nd test Updates, virat kohli: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दिल्लीत (Delhi) सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी (Second Test) सामन्यात मोठा वाद झाला. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला (Virat Kohli) ज्या पद्धतीने बाद असल्याचा निर्णय देण्यात आला, त्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. केवळ चाहतेच नाही तर खुद्द विराट कोहली आणि टीम इंडियाचे व्यवस्थापनही या बाद देण्याच्या निर्णयावरून निराश झाले. (IND vs AUS: Controversy over Virat Kohli’s lbw dismissal)
ADVERTISEMENT
50व्या षटकात मॅथ्यू कुनहेमनने विराट कोहलीला चेंडू टाकला, तेव्हा तो चेंडू पॅडला लागला. अपील केल्यानंतर अंपायरने विराट कोहलीला बाद असल्याचा निर्णय दिला. नंतर विराट कोहलीने रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यूमध्येही विकेटवर चेंडू थेट पॅडवर लागल्याचं स्पष्ट दिसत नव्हतं, मात्र अंपायरने विराट बाद असल्याचा निर्णय दिला आणि त्याला मैदान सोडावं लागलं.
थंर्ड अंपायरने पंचाने विराट कोहलीला आऊट दिल्यावर तो संतापला आणि आक्षेप घेत पॅव्हेलियनमध्ये परतला. ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या टीम इंडियाचे व्यवस्थापनही या निर्णयावर नाखूश झाले. टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोडही तिसऱ्या पंचाच्या निर्णयावर खूश नव्हते.
टीम इंडिया अडचणीत असताना विराट कोहली सावधपणे खेळी करत होता. कोहली रवींद्र जडेजासोबत टीम इंडियाच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न करत होता. या खेळीत विराट कोहलीने 84 चेंडूत 44 धावा केल्या, ज्यात त्याने 4 चौकार मारले.
विराट कोहली कसा आऊट झाला?
ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू कुन्हमनने टाकलेला चेंडू खेळताना टाकला. विराट कोहली तो चेंडू सरळ खेळत होता. बचाव करत असताना चेंडू बॅट-पॅडला लागला. मैदानावर उभ्या असलेल्या अंपायरने विराट कोहलीला आऊट दिलं, पण विराटने सांगितलं की, त्याच्या बॅटला आधी बॉल लागला आहे आणि चेंडू नंतर पॅडला लागला. विराट कोहलीने इथे रिव्ह्यू घेतला. रिप्ले दाखवला तेव्हाही चेंडू पहिल्यांदा बॅटला लागल्याचे दिसत आहे. रिव्ह्यूनंतर थंर्ड अंपायरने मैदानावरील अंपायरचा निर्णय कायम ठेवला.
ADVERTISEMENT