ADVERTISEMENT
तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पाच गडी राखून पराभव केला.
याच सामन्यात विराट कोहलीने असं काही केलं की, ज्याची आता चर्चा होतेय.
किंग कोहली लाइव्ह सामन्यात फिल्डिंग करताना नाटू-नाटू गाण्याच्या स्टेप्सवर थिरकताना दिसला.
विराट कोहलीचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
RRR चित्रपटातील नाटू-नाटू या गाण्याला नुकताच ऑस्कर पुरस्कार मिळाला.
पण, यावेळी लाइव्ह सामन्यामध्ये कोहलीने नाटू-नाटूच्या स्टेप्स रिक्रीएट करत चांगलाच ठेका धरल्याने तो चर्चेत आला आहे.
सामन्याच्या सुरूवातीला नाणेफेकनंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 188 धावा केल्या होत्या.
विराट कोहली काही विशेष करू शकला नाही. त्याला चार धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर स्टार्कने आउट केले.
ADVERTISEMENT