गेल्या काही दिवसांपासून बीसीसीआयमध्ये नेतृत्वबदलाचं वादळ आता काहीसं शमताना दिसत आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मामधला कथित वाद, दक्षिण आफ्रिका दौऱ्यात विराट वन-डे मालिका खेळणार नसल्याचा संभ्रम या सर्व बाबींवर विराटने आपलं परखड मत मांडलं. आपल्याबद्दल चुकीच्या बातम्या पसरवल्या जात असल्याचं म्हणत विराटने आपली बाजू स्पष्ट केली.
ADVERTISEMENT
दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होण्याआधी विराटने BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची विकेट काढत त्याने केलेलं एक विधान खोडून काढलं आहे.
Rohit Sharma सोबतच्या कथित वादावर Virat म्हणतो, ‘मी आता सांगून-सांगून थकलोय’
जाणून घ्या काय म्हणाला होता सौरव गांगुली?
UAE मध्ये आयोजित टी-२० विश्वचषकाला सुरुवात होण्याआधीच विराटने आपण टी-२० संघाची कॅप्टन्सी सोडणार असल्याचं जाहीर केलं. कर्णधार म्हणून आपल्या अखेरच्या स्पर्धेतही विराट भारताला आयसीसी ट्रॉफी जिंकवून देण्यात अपयशी ठरला. विराटच्या या निर्णयावर भाष्य करताना बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने आपण त्याला टी-२० संघाची कॅप्टन्सी न सोडण्यास सांगतिलं होतं असं सांगितलं.
“मी स्वतः विराटशी बोललो होतो आणि त्याला टी-२० संघाची कॅप्टन्सी सोडू नकोस असं सांगितलं. परंतू वर्कलोडमुळे त्याने असा निर्णय घेतला. माझ्या मते यात काही चुकीचंही नाहीये. तो प्रदीर्घ काळापासून खेळत असून भारतासाठी एक महत्वाचा खेळाडू आहे. विराटच्या या निर्णयामुळेच निवड समितीने White Ball Cricket मध्ये एकच कर्णधार नेमण्याचं ठरवलंय. कारण प्रत्येक प्रकारासाठी नवा कर्णधार असं आम्हाला करायची नव्हतं.
परंतू गांगुलीचं हेच वक्तव्य विराट कोहलीने आजच्या पत्रकार परिषदेत खोटं पाडलं आहे. “टी-२० संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय मी सर्वात आधी BCCI ला सांगितला. त्यांनीही माझ्या या निर्णयाचं स्वागत केलं. माझ्या निर्णयाबद्दल कोणालाही प्रॉब्लेम नव्हता. मला कोणीही सांगितलं नाही की तू टी-२० ची कॅप्टन्सी सोडू नकोस, याउलट त्यांनी माझ्या निर्णयाची स्तुती केली. मी त्यावेळी टेस्ट आणि वन-डे संघाची कॅप्टन्सी करु इच्छितो असंही सांगितलं होतं. परंतू निवड समितीला काही वेगळा निर्णय घ्यायचा असेल तर ते ही मला मान्य आहे”, असं म्हणत विराटने आपली बाजू स्पष्ट केली.
Virat Kohli: ‘सिलेक्टर्सने अगदी कॉल कट करताना सांगितलं.. आता तू वनडेचा कॅप्टन नाही’, विराटने सांगितला ‘तो’ किस्सा
भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ३ कसोटी आणि ३ वन-डे सामने खेळणार आहे. २६ डिसेंबरला भारताच्या आफ्रिका दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यातली ४ टी-२० सामन्यांची मालिका दोन्ही बोर्डांनी ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलली आहे.
India Vs South Africa, Rohit Sharma: भारताला धक्का! कसोटी मालिकेतून रोहित शर्मा बाहेर
ADVERTISEMENT