‘बायको बेशुद्ध पडली होती, मी रडत होतो’, वसीम अक्रमने सांगितली भारतातील ‘ती’ आठवण

मुंबई तक

20 Sep 2023 (अपडेटेड: 21 Sep 2023, 06:06 AM)

वसीम अक्रम म्हणजे पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज. त्याच्या क्रिकेटच्या अनेक आठवणी असल्या तरी त्याने भारतातील एक आठवण त्याने आत्मचरित्रात सांगितली आहे. तो म्हणतो की, चेन्नई विमानतळावरील अधिकाऱ्यांमुळे मी तो क्षण क्रिकेटर आणि माणूस म्हणूनही कधीच विसरु शकणार नाही.

Pakistan cricketer Wasim Akram shares experience of india trip

Pakistan cricketer Wasim Akram shares experience of india trip

follow google news

Wasim Akram : पाकिस्तानचा माजी कर्णधार (Former Pakistan captain) आणि वेगवान गोलंदाज म्हणून जगभरात ओळख असलेल्या वसीम अक्रमने भारताबाबतची त्याच्या आयुष्यातील एक आठवण सांगितली आहे. त्याने गोष्ट सांगितली आहे ती, 2009 मधील. त्याची पत्नी आजारी असताना चेन्नईतील भारतीय अधिकाऱ्यांनी (Indian Officer) त्याला आणि त्याच्या पत्नीला केलेल्या मदतीची आठवण त्याने सांगितली आहे.  ही आठवण त्याने सुलतानः अ मेमोयर या आत्मचरित्रावर द हिंदू लिट फॉर लाईफ लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाल्यावर सांगितले. तो या कार्यक्रमात ऑनलाईनद्वारे सहभागी झाला होता. (Former Pakistan cricketer Wasim Akram recounted memory Indian authorities his wife Huma Akram was ill)

हे वाचलं का?

यावेळी त्याने त्याच्या दिवंगत पत्नीच्या आठवणी सांगताना त्यांनी ही भारताबद्दलची एक आठवण सांगितली. त्यांची पत्नी हुमा अक्रम (Huma Akram) हृदय आणि मूत्रपिंडाच्या आजारामुळे मृत्यू पावली होती.

भारतीय अधिकाऱ्यांची माणूसकी

वसीम अक्रमने आपल्या आजारी पत्नीला ऑक्टोबर 2009 मध्ये लाहोरहून सिंगापूरला एअर अॅम्ब्यलन्समधून घेऊन जात होता. त्यावेळी तो सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये त्यांच्या पत्नीवर उपचार केले जाणार होते. त्यावेळी काही कारणामुळे विमान चेन्नई विमानतळावर उतरवण्यात आले होते. त्यावेळी चेन्नईमध्ये भारतीय अधिकाऱ्यांनी त्यांना मदत केली होती ही गोष्ट त्यांनी आठवणीने सांगितली आहे.

हे ही वाचा >> Women Reservation Bill : ‘विधेयकाला पाठिंबा, पण…’, सोनिया गांधी मोदी सरकारला काय म्हणाल्या?

नेमकी घटना काय ?

भारताविषयी वसीम अक्रम सांगतात की, माझ्या पत्नीच्या उपचारासाठी मी पत्नीला सिंगापूरला घेऊन जात होतो. त्यावेळी काही कारणास्तव विमान चेन्नईमध्ये उतरवण्यात आले होते. नेमकं त्याचवेळी माझी पत्नी बेशुद्ध झाली होती. पत्नीच्या अवस्थेमुळे मला रडू आले मात्र त्यावेळी लोकांनी मला ओळखले होते. त्याचवेळी माझ्याकडे नेमका भारतीय व्हिसा नव्हता, तर पाकिस्तानी व्हिसा होता. तरीही विमानतळावरील सुरक्षा कर्मचारी, कस्टम अधिकारी, आणि इतर लोकांनी मला मदत केली. त्यावेळी त्याच लोकांनी माझ्या पत्नीला रुग्णालयात घेऊन जाण्यास मदत केली. अधिकाऱ्यांनीही व्हिसा नसला तरी त्याची काळजी करु नका असं सांगत व्हिसाचा प्रश्न मिठवला होता. त्यामुळे मला क्रिकेटर आणि माणूस म्हणून मिळालेली ती वागणूक मी कधीच विसरु शकणार नाही. अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.

हे ही वाचा >> Ajit Pawar : ‘सुप्रिया सुळेंना नैराश्य आलं’, अजित पवार गटाची टीका

क्रिकेटमधील महान गोलंदाज

वसीम अक्रमने याच वेळी 1999 मधील चेन्नई कसोटीत पाकिस्तानचा झालेल्या विजयाचीही आठवण करुन दिली आहे. वसीम अक्रमची गणना पाकिस्तान जगतातच नाही तर जगातील महान गोलंदाजांमध्येही केली जाते.

खेळवसीम अक्रमचा

अक्रमने पाकिस्तानसाठी 104 कसोटी खेळल्या आणि 23.62 च्या सरासरीने 414 विकेट घेतल्या. त्याने एकदिवसीय सामन्यात 356 सामन्यात 502 विकेट घेतल्या.

    follow whatsapp