दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर निघण्याआधी भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीने केलेल्या वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा होते आहे. आपल्याला कर्णधारपदावरुन हटवण्यापासून ते बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने केलेल्या वक्तव्याला खोटं ठरवत विराटने या पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट केले. विराटच्या या पत्रकार परिषदेवर बीसीसीआयनेही भूमिका घेतली आहे.
ADVERTISEMENT
BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीने प्रसारमाध्यमांशी बोलताना विराट कोहलीच्या पत्रकार परिषदेवर व्यक्त होण्यासाठी नकार दिलाय. “मला आता याबद्दल काहीही बोलायचं नाहीये, आम्ही योग्य पद्धतीने या प्रकरणात लक्ष घालू, तुम्ही हे बीसीसीआयवर सोडा.”
काय म्हणाला होता सौरव गांगुली?
“मी स्वतः विराटशी बोललो होतो आणि त्याला टी-२० संघाची कॅप्टन्सी सोडू नकोस असं सांगितलं. परंतू वर्कलोडमुळे त्याने असा निर्णय घेतला. माझ्या मते यात काही चुकीचंही नाहीये. तो प्रदीर्घ काळापासून खेळत असून भारतासाठी एक महत्वाचा खेळाडू आहे. विराटच्या या निर्णयामुळेच निवड समितीने White Ball Cricket मध्ये एकच कर्णधार नेमण्याचं ठरवलंय. कारण प्रत्येक प्रकारासाठी नवा कर्णधार असं आम्हाला करायची नव्हतं.”
गांगुलीचं हेच वक्तव्य विराट कोहलीने आजच्या पत्रकार परिषदेत खोटं पाडलं आहे. “टी-२० संघाचं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय मी सर्वात आधी BCCI ला सांगितला. त्यांनीही माझ्या या निर्णयाचं स्वागत केलं. माझ्या निर्णयाबद्दल कोणालाही प्रॉब्लेम नव्हता. मला कोणीही सांगितलं नाही की तू टी-२० ची कॅप्टन्सी सोडू नकोस, याउलट त्यांनी माझ्या निर्णयाची स्तुती केली. मी त्यावेळी टेस्ट आणि वन-डे संघाची कॅप्टन्सी करु इच्छितो असंही सांगितलं होतं. परंतू निवड समितीला काही वेगळा निर्णय घ्यायचा असेल तर ते ही मला मान्य आहे”, असं म्हणत विराटने आपली बाजू स्पष्ट केली.
‘कोणाकडेही बोट दाखवणं चांगलं नाही’, Virat Kohli च्या पत्रकार परिषदेतील भूमिकेवर कपिल देव नाराज
ADVERTISEMENT