Women primer league समोर IPLपण फेल; सलामीच्या सामन्यातच बनला रेकॉर्ड

मुंबई तक

• 01:17 AM • 05 Mar 2023

Women primer league : महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या सत्राला सुरुवात झाली आहे. शनिवारी (4 मार्च) खेळल्या गेलेल्या या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा 143 धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सच्या संघाने पाच गडी गमावून 207 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुजरात जायंट्सचा संघ 64 धावांत ऑलआऊट झाला. The first season of the Women’s […]

Mumbaitak
follow google news

Women primer league : महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या सत्राला सुरुवात झाली आहे. शनिवारी (4 मार्च) खेळल्या गेलेल्या या स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा 143 धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सच्या संघाने पाच गडी गमावून 207 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात गुजरात जायंट्सचा संघ 64 धावांत ऑलआऊट झाला. The first season of the Women’s Premier League (WPL) has begun

हे वाचलं का?

मुंबई इंडियन्सचा 143 धावांनी विजय हा महिलांच्या T20 क्रिकेटच्या इतिहासातील कोणत्याही संघाचा सर्वात मोठा विजय आहे. याआधी, महिलांच्या T20 क्रिकेटमध्ये धावांच्या बाबतीत सर्वात मोठ्या विजयाचा विक्रम 122 धावांचा होता, जो वेलिंग्टनने 2021 मध्ये ओटागोविरुद्ध मिळवला होता. महिला प्रीमियर लीग ज्या स्फोटक पद्धतीने सुरू झाली आहे, त्याने एकप्रकारे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)मागे टाकले आहे.

WPL 2023 : मुंबईची विजयी आरंभ, गुजरातला 143 धावांनी चारली धूळ

2008 मध्ये सुरू झाली इंडियन प्रीमियर लीगची सुरुवात

आयपीएलचू सुरवात 2008 साली झाली. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोरविरुद्ध (RCB) कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यात झाला. त्या सामन्यात केकेआरने आरसीबीचा 140 धावांनी पराभव केला होता, तर WPL च्या पहिल्या सामन्यात मुंबईने गुजरातचा 143 धावांनी पराभव केला. आयपीएलच्या उद्घाटनाच्या सामन्यात केकेआरने 222 धावा केल्या होत्या, तर WPLच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने 207 धावा केल्या.ब्रेंडन मॅक्क्युलमने RCB विरुद्ध नाबाद 158 धावा करून IPL मध्ये झंझावाती सुरुवात केली, तर हरमनप्रीत कौरने देखील या WPL च्या पहिल्याच सामन्यात आपल्या धडाकेबाज फलंदाजीने चाहत्यांना नाचायला भाग पाडले.

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक गमावल्यानंतर मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजीला सुरुवात केली आणि काही वेळातच डावखुरी फिरकी गोलंदाज तनुजा कंवरने पॉइंटवर झेल घेतलेल्या यस्तिका भाटियाची (1) विकेट गमावली. यानंतर नॅट सायव्हर-ब्रंट आणि हेली मॅथ्यूज यांनी 54 धावांची शानदार भागीदारी करत डाव सांभाळला.

WPL 2023: दहावीतील मुलगी गाजवणार वुमन प्रीमियर लीग!

जॉर्जिया वेअरहॅमने भागीदारी संपुष्टात आणण्यासाठी नॅट सायव्हर-ब्रंटला बाद केले. मॅथ्यूज आपला अर्धशतक पूर्ण करू शकली नाही आणि अॅशले गार्डनरच्या गोलंदाजीवर पॅव्हेलियनमध्ये परतली. मॅथ्यूजने तीन चौकार आणि चार षटकारांसह 47 धावा केल्या. त्याचवेळी सिव्हर-ब्रंटने 18 चेंडूत 23 धावा केल्या.

हरमन-केरने बॅटने कहर केला

दोघे बाद झाल्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर आणि एमिलिया केर यांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. हरमनप्रीतने आधी मोनिका पटेलला सलग चार चौकार मारले आणि त्यानंतर गार्डनरलाही सलग तीन चौकार लगावले आणि अर्धशतक पूर्ण केले. हरमनने अवघ्या 22 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

हरमनप्रीतची ही शानदार खेळी ऑफस्पिनर स्नेह राणाने संपुष्टात आणली. हरमनप्रीतने 30 चेंडूत 14 चौकारांसह 65 धावांची खेळी केली. हरमन आणि केरमध्ये चौथ्या विकेटसाठी 89 धावांची भागीदारी झाली, त्यानंतर एमिलिया केर आणि पूजा वस्त्राकर यांनी डेथ ओव्हर्समध्ये तुफानी फलंदाजी करत मुंबईला 200 धावांच्या पुढे नेले. केरने 45 धावांच्या नाबाद खेळीत सहा चौकार आणि एक षटकार लगावला.

हेमलता यांनी गुजरातची लाज वाचवली

मोठ्या लक्ष्यासमोर गुजरात जायंट्सचा संघ सुरुवातीलाच गारद झाला. एके काळी गुजरातची धावसंख्या 7 बाद 23 अशी होती आणि त्यांचा डाव 50 धावांतच संपताना दिसत होता, पण डी. हेमलताने नाबाद 29 धावा करून संघाची लाज वाचवली. मुंबईसाठी डावखुरा फिरकीपटू सायका इशाकने 11 धावांत चार बळी घेतले. त्याचवेळी नॅट सायव्हर-ब्रंट आणि एमिलिया केर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

    follow whatsapp