Yashasvi Jaiswal smashes World record : झिम्बाबे विरुद्धच्या पाचव्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जयस्वालने (Yashavsi Jaiswal) इतिहास रचला आहे. यशस्वी जयस्वालने अवघ्या 12 धावा काढून हा रेकॉर्ड केला आहे. विशेष म्हणजे टी20 क्रिकेटच्या इतिहासात अशाप्रकारचा रेकॉर्ड कोणत्याही खेळाडूच्या नावावर नाही आहे. तो रेकॉर्ड आता यशस्वी जयस्वालच्या नावे झाला आहे. त्यामुळे यशस्वी जयस्वालच्या नावे झालेला हा रेकॉर्ड काय आहे? हे जाणून घेऊयात. (yashasvi jaiswal smashes world record against zimbabwe 12 runs in 1 ball india vs zimbabwe)
ADVERTISEMENT
पाचव्या टी20 सामन्याचा टॉस झिम्बाबेने जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वाल आणि शुभमन गील सलामीला उतरले होते. या दरम्यान झिम्बाबेच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर यशस्वीने खणखणीत षटकार ठोकला होता. त्यात हा पहिलाच बॉल कमरेच्या वर आल्याने अंपायर्सकडून नो बॉल देण्यात आला होता.
हे ही वाचा : Chhagan Bhujbal : 'शरद पवारांचे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेत', भुजबळांच्या विधानाने खळबळ
त्यामुळे दुसऱ्या बॉलवर फ्रीहीट मिळाल्याने यशस्वीकडे मोठा शॉट खेळण्याची संधी होती. याच संधीचा फायदा घेत यशस्वी जयस्वालने थेट अंपायरच्या डोक्यावर षटकार मारला होता. त्यामुळे 1 बॉलमध्ये यशस्वी जयस्वालने 12 धावा केल्या होत्या. टी20 च्या इतिहासात 1 बॉलमध्ये 12 धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या धावा करून यशस्वी जयस्वालने इतिहास रचला आहे. दरम्यान सामन्याच्या सुरुवातीलाच जोरदार फटकेबाजी करणारा यशस्वी जयस्वाल 5 बॉल खेळून 12 धावा करून आऊट होतो.
जयस्वालनंतर शुभमन गिल, अभिषेक शर्मा 13 आणि 14 धावावर स्वस्तात बाद झाले. त्यानंतर मैदानात उतरलेल्या संजू सॅमसनने भारताचा डाव सांभाळला. संजू सॅमसनने 45 बॉलमध्ये 58 धावा ठोकल्या होत्या.त्यानंतर रियान परागने 22, शिवम दुबेने 26, रिंकूने नाबाद 11 आणि वॉशिग्टने नाबाद 1 धावा केली होती. या धावांच्या बळावर टीम इंडियाने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 167 धावा ठोकल्या आहेत.
हे ही वाचा : Majhi Ladki Bahin Yojana कधीपर्यंत सुरू राहणार? अजित पवारांनी बारामतीत सांगून टाकलं
झिम्बाबे समोर आता 168 धावांचे आव्हान असणार आहे. आता झिम्बाबे हे आव्हान पुर्ण करते की टीम इंडिया त्यांना रोखते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ADVERTISEMENT