Yograj Singh: "युवराजचा कॅन्सरने मृत्यू झाला असता तरी मला अभिमान...", योगराज सिंग यांचं बेधडक विधान!

Yograj Singh On Yuvraj Singh :  युवराज सिंगचे वडील योगराज सिंग पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. यावेळी योगराज सिंग यांनी त्यांचा मुलगा युवराज सिंगबाबत मोठं विधान केलं आहे.

Yuvraj Singh Father Yograj Singh Statement viral

Yuvraj Singh Father Yograj Singh Statement viral

मुंबई तक

13 Jan 2025 (अपडेटेड: 13 Jan 2025, 03:14 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांंचं खळबळजनक विधान!

point

"आपल्या देशासाठी जर युवराजचा कॅन्सरने मृत्यू झाला असता, तर..."

point

योगराज सिंग नेमकं काय म्हणाले?

Yograj Singh On Yuvraj Singh :  युवराज सिंगचे वडील योगराज सिंग पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले आहेत. यावेळी योगराज सिंग यांनी त्यांचा मुलगा युवराज सिंगबाबत मोठं विधान केलं आहे. योगराज सिंग यांनी युवराजबाबत दिलेल्या प्रतिक्रियेची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. योगराज यांनी माध्यमांशी बोलता म्हटलं, "युवीचा कॅन्सरने मृत्यू झाला असता, तर मला अभिमान वाटला असता. कारण त्याच्यामुळे भारताने वर्ल्डकप जिंकला होता". 2011 च्या वर्ल्डकपमध्ये युवराज सिंगला प्लेयर ऑफ द सीरिजच्या किताबाने सन्मानित केलं होतं.

हे वाचलं का?


अनफिल्टर्ड बाय सॅमडीशच्या पॉडकास्टवर बोलताना योगराज यांनी म्हटलं की, "आपल्या देशासाठी जर युवराजचा कॅन्सरने मृत्यू झाला असता आणि देशाला वर्ल्डकप जिंकवून दिलं असंतं, तर मी एक गौरवशाही पिता असतो. मला आजही त्यांच्यावर खूप गर्व आहे. मी त्यांना फोनवरही हे सांगितलं आहे. जेव्हा तो रक्त थुंकायचा, त्यावेळीही तो खेळावा, असं मला वाटायचं. मी त्याला म्हणालो, चिंता नको करू. तूझा मृत्यू होणार नाही. भारतासाठी हा विश्वकप जिंकून ठेव".

हे ही वाचा >> Champions Trophy 2025 : टीम इंडियाला धक्का! पाकिस्तान विरुद्ध होणाऱ्या सामन्यातून भारताचा हुकमी एक्का बाहेर?

युवराज सिंग ज्यावेळी 2011 चा वर्ल्डकप खेळत होता, त्यावेळी त्याला फुफ्फुसाच्या कॅन्सरला सामोरं जावं लागलं होतं. वर्ल्डकपनंतर युवराज टीममधून बाहेर झाला होता आणि अमेरिकेच्या एक प्रसिद्ध रुग्णालयात उपचार घेत होता. कॅन्सरने मुक्त झाल्यानंतर युवराजने टीममध्ये पुनरागमन केलं आणि पुढील काही वर्षांसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं. युवराजने वर्ष 2019 मध्ये वर्ल्डकपआधीच निवृत्तीची घोषणा केली होती.

हे ही वाचा >> Viral Video: आरारारारा खतरनाक! 6,4,4,6,4,6.. 'या' धडाकेबाज फलंदाजाने कायल मेयर्सला धू-धू-धुतलं

युवराज सिंगला भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात बेस्ट फलंदाज म्हणून ओळखलं जातं. युवराजने त्याच्या फलंदाजी आणि गोलंदाजीतून म्हणजेच अष्टपैलू कामगिरीतून भारतीय क्रिकेटला मोठं योगदान दिलं आहे. युवराजच्या ऐतिहासिक कामगिरीला क्रिकेट चाहते कधीच विसरले नाहीत. 2011 च्या वर्ल्डकपमध्ये युवराजने 90.50 च्या सरासरीनं आणि 86.19 च्या स्ट्राईक रेटने 362 धावा केल्या. युवराजने भारताला वर्ल्डकप जिंकवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

    follow whatsapp