Tokyo Olympics : Chak De India! कोच जोर्द मरीन यांचे ‘ते’ शब्द आणि भारतीय महिलांनी ऑस्ट्रेलियाला धुळ चारली

मुंबई तक

• 10:30 AM • 02 Aug 2021

भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियावर मात करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. १-० ने भारतीय महिलांनी या सामन्यात विजय मिळवला. भारतीय संघाच्या या विजयाची शिल्पकार ठरली ती गोलकिपर सविता पुनिया. सविता पुनियाने संपूर्ण सामन्यात बचावफळीच्या सहाय्याने ९ पेनल्टी कॉर्नर वाचवत भारताची आघाडी कायम ठेवत संघाच्या विजयात मोलाची भूमिका निभावली. भारतीय महिला हॉकी […]

Mumbaitak
follow google news

भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियावर मात करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. १-० ने भारतीय महिलांनी या सामन्यात विजय मिळवला. भारतीय संघाच्या या विजयाची शिल्पकार ठरली ती गोलकिपर सविता पुनिया. सविता पुनियाने संपूर्ण सामन्यात बचावफळीच्या सहाय्याने ९ पेनल्टी कॉर्नर वाचवत भारताची आघाडी कायम ठेवत संघाच्या विजयात मोलाची भूमिका निभावली.

हे वाचलं का?

भारतीय महिला हॉकी संघाची या स्पर्धेतली सुरुवात फारशी चांगली झालेली नव्हती. पहिले ३ सामने गमावल्यानंतर भारतीय महिलांनी आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. यानंतर ग्रेट ब्रिटनने आयर्लंडला हरवल्यामुळे भारतीय महिलांना उपांत्यपूर्व फेरीचं तिकीट मिळालं. भारतीय महिला हॉकी संघाला मार्गदर्शन करणारे कोच जोर्द मरीन यांनी सामना सुरु होण्याआधी चक दे इंडिया पिक्चरमधील शाहरुख खानसारखा एक संदेश भारतीय महिलांना दिला.

सामना संपल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सवीता पुनियाने याबद्दल माहिती दिली. “हा तुमचा ऑलिम्पिकमधला पहिला आणि शेवटचा सामना समजा. तुमच्याकडे फक्त ६० मिनीटं आहेत, त्यामुळे जमेल तेवढे सर्व प्रयत्न करुन मेहनतीने खेळा. आपल्या हातातली ही शेवटची संधी आहे असं समजून पुरेपूर प्रयत्न करा.” कोचच्या या शब्दांमुळे आम्हाला अधिक प्रेरणा मिळाली असंही सविता पुनियाने सांगितलं.

भारतीय महिलांनी Tokyo Olympics मध्ये रचला इतिहास, बलाढ्य ऑस्ट्रेलियावर मात करत उपांत्य फेरीत प्रवेश

ज्यावेळेला भारतीय संघाला गरज होती, त्यावेळी भारतीय संघाने आश्वासक खेळ केल्याचं सविता पुनियाने सांगितलं. “आम्ही एक संघ म्हणून आजच्या सामन्यात खेळलो. ज्या-ज्या क्षणी आम्ही बॉलवरचा ताबा सोडत होतो, त्यानंतर तो ताबा पुन्हा आमच्याकडे कसा येईल हा एकच विचार आमच्या मनात होता. रिटॅकल, रिटॅकल आणि रिटॅकल ही एकच रणनिती घेऊन आम्ही मैदानात उतरलो होतो.” पुरुष संघाने इतिहास घडवल्यानंतर भारतीय महिला संघाने कोट्यवधी भारतीयांना पदकाच्या आशा दाखवल्या आहेत. त्यामुळे उपांत्य फेरीचं आव्हान भारतीय संघ कसं पूर्ण करेल हे पाहणं आवश्यक ठरणार आहे.

Tokyo Olympic 2020 : ४१ वर्षांनी भारतीय हॉकी संघ पदकाच्या शर्यतीत, इंग्लंडवर ३-१ ने मात

    follow whatsapp