Aryan Khan drugs case : समीर वानखेडेंचा 25 कोटी खंडणीचा डाव एका फोटोने उधळला! वाचा इनसाईड स्टोरी

मुंबई तक

ADVERTISEMENT

allegation on Sameer Wankhede that he tried to extort Rs 25 crore from Shah Rukh Khan after arrest to aryan khan in drugs case
allegation on Sameer Wankhede that he tried to extort Rs 25 crore from Shah Rukh Khan after arrest to aryan khan in drugs case
social share
google news

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) अर्थात अमली पदार्थ विरोधी विभागाचे मुंबईचे माजी संचालक समीर वानखेडे पुन्हा एकदा वादात अडकले आहेत. एनसीबीच्या दक्षता चौकशीत वानखेडेंबाबत अनेक मोठे खुलासे झाले आहेत. तसेच कॉर्डेलिया क्रूझवर छापेमारीचा संपूर्ण कट कसा रचला गेला आणि 25 कोटी रुपये वसूल करण्याचे नियोजन कसे केले गेले होते, याबद्दलही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. (aryan khan drugs case inside story : what was plan of sameer wankhede to extort money from pooja dadlani)

ADVERTISEMENT

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर एनसीबीने समीर वानखेडेंसह काही अधिकाऱ्यांची दक्षता चौकशी लावली होती. एनसीबीच्या या दक्षता चौकशी अहवालाच्या आधारे सीबीआयने समीर वानखेडे यांच्यासह एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. दक्षता तपासाशी संबंधित सूत्रांनी ‘आज तक’ला समीर वानखेडे आणि आर्यन खान अटक प्रकरणातील महत्त्वाची माहिती दिली.

कोण आहे सॅमविल डिसोझा?

समोर आलेल्या तपशिलानुसार, एनसीबीच्या दक्षता पथकाती एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे समविल डिसोझा याने वानखेडेंबाबत अनेक मोठे खुलासे केले आहेत. डिसोझा हा ड्रग्ज सप्लायर होता. समीर वानखेडे यांच्या एनसीबीच्या पथकाने एलएसडी ड्रग्जच्या गुन्ह्यात त्याला पकडले होते. त्यादरम्यान समीर वानखेडे आणि त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांनीही 10 लाखांची लाच घेतल्याचा दावा केला जात आहे.

हेही वाचा >> आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात मोठा गौप्यस्फोट, शाहरुख खान-समीर वानखेडेंचं WhatsApp चॅट जसंच्या तसं

आरोपांनुसार हे पैसे व्हीव्ही सिंग आणि समीर वानखेडे यांनी स्वत: घेतल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. नंतर समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमने डिसोझालाच त्यांचा खबरी बनवलं. यानंतर तो वानखेडेच्या टीमसाठी माणसं शोधू लागला. इतकेच नाही तर एनसीबीच्या या पथकाने बनावट ड्रग्ज कटात डिसोझाचाही वापर केल्याचा आरोप आहे.

गुजरातचे पाटील आणि डिसोझा यांचे कनेक्शन

समीर वानखेडे यांना गुजरातमधील पाटील नावाच्या व्यक्तीने क्रूझवर होणाऱ्या पार्टीची माहिती दिली होती. क्रूझवर ड्रग्ज पार्टीही होणार असल्याचे सांगण्यात आले होते. या पार्टीत काही मोठे व्यापारी आणि नामांकित लोक सहभागी होणार असून त्यांना टार्गेट केले जाऊ शकते, असे वानखेडे यांना सांगण्यात आले. मात्र, तोपर्यंत एनसीबीला आर्यन खान पार्टी सहभागी होणार असल्याची माहिती नव्हती.

ADVERTISEMENT

डिसोझा आणि पाटील एकमेकांना ओळखत होते. एनसीबीने क्रूझवर छापा टाकण्याची योजना आखली तेव्हा डिसोझाने भानुशाली आणि किरण गोसावी या दोन खासगी व्यक्तींची वानखेडे आणि एनसीबीचे अधिकारी व्हीव्ही सिंग यांची ओळख करून दिली. एनसीबीने भानुशाली आणि किरण गोसावी यांना क्रूझवर मोठे मासे (प्रसिद्ध व्यक्ती) पकडण्याची जबाबदारी दिली.

ADVERTISEMENT

एनसीबीच्या यादीत आर्यनसह 10 जणांचा समावेश होता

एनसीबीने 27 जणांना टार्गेट करण्याची यादी तयार केली होती, पण आर्यन खान त्याच्या मित्रांसोबत क्रूझवर येत असल्याची माहिती समीर वानखेडेंना मिळताच ती यादी लहान करण्यात आली आणि या यादीत फक्त 10 नावांचा समावेश करण्यात आला.

हेही वाचा >> Aryan khan case : महागडी घड्याळं, परदेशी वाऱ्या; समीर वानखेडेंविरोधात काय सापडलं?

2 ऑक्टोबर 2021 च्या रात्री आर्यन कॉर्डेलिया क्रूझवर आला. त्याला पकडण्यात आले. त्याचा फोन NCB ने ताब्यात घेतला जेणेकरून त्याला त्याच्या घरी फोन करता येऊ नये. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानसोबत त्याचे इतर चार मित्रही क्रूझमध्ये होते, मात्र अरबाजच चरससह सापडला. त्याला पकडण्यात आले. आर्यनच्या इतर तीन मित्रांकडून ड्रग चॅट्सही जप्त करण्यात आल्या होत्या, पण त्यांना सोडून फक्त आर्यन खानला मुख्य टार्गेट करण्यात आले.

आर्यनच्या फोनवरून आला होता मेसेज

अरबाजने आपल्या पहिल्या जबाबात स्पष्टपणे सांगितले होते की, आर्यनकडे ड्रग्ज नव्हते. ना त्याने ड्रग्ज घेतले होते आणि त्याने आम्हालाही नकार दिला होता. नंतर समीर वानखेडेंच्या नेतृत्वाखाली आर्यन खानच्या कुटुंबाकडून वसुली सुरू झाली. हा सर्व प्रकार 2-3 ऑक्टोबरच्या रात्री घडला. किरण गोसावी हा एनसीबीचा अधिकारी असल्याचे आर्यन खानला सांगण्यात आले.

किरणने आर्यनचा बनवला होता ऑडिओ

गोसावीने एनसीबी कार्यालयात आर्यन खानचा ऑडिओ बनवला. तुम्हाला किरण गोसावीचे ते फोटो आठवत असतील, ज्यात आर्यन खान बसला होता आणि गोसावी त्याच्या जवळ दिसत होता. वास्तविक, किरणने व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून आर्यनचा एक ऑडिओ बनवला होता. आर्यन खानने ऑडिओमध्ये म्हटले होते की, ‘पपा मी एनसीबीच्या ताब्यात आहे, कृपया मला मदत करा.’

पूजा ददलानीला पाठवला होता मेसेज

समीर वानखेडे अँड टीमने नंतर आर्यन-गोसावीचा सेल्फी आणि ऑडिओ पूजा ददलानी म्हणजेच शाहरुख खानच्या मॅनेजरला कसा पाठवायचा याची योजना आखली, जेणेकरून पुढील बोलणी सुरू करता येईल. आर्यनचा आवाज आणि गोसावीचा आर्यन खानसोबतचा सेल्फी शाहरुख खानपर्यंत पोहोचायचा होता. यानंतर वानखेडे आणि त्याच्या टीमने पूजा ददलानीचा नंबर मिळवला. आर्यनचा सेल्फी आणि त्याचा ऑडिओ पाठवला. आर्यन खान क्रूझवर ड्रग्ज घेत होता, त्याच्या फोनमधून ड्रग्जच्या चॅट्स सापडल्याचंही सांगण्यात आलं होतं. आर्यन खानला वैद्यकीय चाचणी करायला घेऊन जात आहोत, असंही त्यांनी सांगितलं.

25 कोटींची मागणी, 18 कोटींचा सौदा

आर्यन खान एनसीबीच्या ताब्यात असल्याचे पूजा ददलानीला कळताच ती गोसावीला भेटण्यास तयार झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटींची मागणी करण्यात आली होती, पण नंतर हे प्रकरण 18 कोटींवर मिटले. पूजा ददलानी आणि किरण गोसावी यांची 2-3 ऑक्टोबरच्या रात्री भेट झाली आणि पूजाने गोसावी यांना 50 लाख रुपये दिले.

हेही वाचा >> त्र्यंबकेश्वर वाद : ‘हे कोत्या वृत्तीची लोक’, राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांवर बरसले

दुसऱ्या दिवशी सकाळी किरण गोसावीचा आर्यन खानसोबतचा सेल्फी व्हायरल झाला आणि किरण हा एनसीबीचा अधिकारी नसल्याचे उघड झाले. ही माहिती पूजा ददलानीपर्यंत पोहोचली आणि त्यामुळे कोट्यवधी रुपये वसूल करण्याचा कट अडचणीत आला.

गोसावीने 38 लाख केले होते परत

यानंतर किरण गोसावीने पुन्हा पूजा ददलानीची भेट घेऊन 50 लाखांपैकी 38 लाख परत केले, तर पैसे समीर वानखेडेपर्यंत पोहोचले आहेत, आता ते परत करता येणार नाही, असे सांगून 12 लाख परत केलेच नाही. तोपर्यंत दुसरीकडे आर्यनला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते.

दक्षता चौकशीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात निष्काळजीपणा होता आणि आर्यनच्या अटकेच्या वेळीही एनसीबीने आर्यन खानचा फोन जप्त केला नव्हता. त्यामुळे ही अटक खंडणीसाठी केल्याचा संशय बळावला. इतकंच नाही तर आर्यन खानचं मेडिकलही झालं नाही, कारण समीर वानखेडे अँड कंपनीला माहीत होतं की आर्यन खानच्या कुटुंबाकडून 25 कोटी मिळाले तर ते आर्यनला सोडून द्यायचं आहे.

दक्षता चौकशी सुरू होताच सीसीटीव्हीशी छेडछाड

गोसावी पूजा ददलानीशी फेस टाईम चॅट्समधून बोलत होता. दुसरीकडे, दुसर्‍या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गोसावी हा समीर वानखेडेंशी डीलशी संबंधित अपडेट्सही देत होता. एनसीबीच्या दक्षता चौकशीशी संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या वेळी किरण गोसावी एनसीबी कार्यालयात आर्यन खानसोबत दिसला, त्यावेळी एनसीबी कार्यालयातील सर्व सीसीटीव्ही कार्यरत होते, मात्र या प्रकरणाची दक्षता चौकशी सुरू होताच दक्षता चौकशी टीम जेव्हा NCB मुंबई कार्यालयात पोहोचली तेव्हा तेथील सर्व सीसीटीव्ही फुटेजमध्ये छेडछाड करण्यात आली होती. तसेच डीव्हीआरही वेगळा करण्यात आला होता.

दक्षता पथकाने महत्त्वाचे पुरावे गोळा केले

एवढेच नाही तर दक्षता चौकशीदरम्यान एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा फोन तपासासाठी दिला असता, तो अनेक वेळा फॉरमॅट करण्यात आला. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे पुरावे दक्षता पथकापर्यंत पोहोचू नयेत म्हणून असे करण्यात आले, मात्र फॉरेन्सिक माध्यमातून सर्व पुरावे सापडले. तसेच, त्यांच्या तपासात दक्षता पथकाने या प्रकरणाशी आणि व्यवहाराशी संबंधित 2 डझनहून अधिक सीसीटीव्ही फुटेज मिळवले आहेत. याशिवाय आरोपींनी डिलीट केलेल्या चॅट्सही हस्तगत करण्यात आल्या आहेत. अनेक इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत.

हेही वाचा >> 2000 note banned : स्वातंत्र्याआधी झाली होती पहिली नोटबंदी; असा आहे इतिहास

एनसीबीच्या दक्षता पथकाने तपासानंतर संपूर्ण अहवाल गृह मंत्रालयाला पाठवला आणि या दक्षता अहवालाच्या आधारे सीबीआयने याप्रकरणी एफआयआर नोंदवला आणि वानखेडेसह सर्व आरोपींच्या ठिकाणांवर छापे टाकले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT