Onion Price : ‘वाजपेयींचं सरकार पडले म्हणून इतके घाबरता का?’, बच्चू कडू मोदी सरकारवर कडाडले
modi government increased export duty on onion export. after this decision mla bacchu kadu gets angry and he attacks on pm modi.
ADVERTISEMENT
-कृष्णा पांचाळ, पिंपरी चिंचवड
ADVERTISEMENT
Bachhu kadu on onion price : ‘दोन-तीन महिने कांदा खाल्ला नाही, तर काही बिघडत नाही. परवडत नसेल, तर खाऊ नका’, असं विधान शिंदे सरकारमधील मंत्री दादा भुसे यांनी केलं. त्यानंतर आता सरकार समर्थक आमदार बच्चू कडूंनीही अशाच आशयाचं एक विधान करत सरकारच्या धोरणावर टीका केलीये. नेमके बच्चू कडू काय म्हणालेत बघुयात…
राज्यात कांद्याचा मुद्दा चिघळला आहे. केंद्राने निर्यात करात वाढ केल्याने हा वाद निर्माण झाला असून, सरकार समर्थक नेत्यांकडूनही याला विरोध होत आहे. ज्यांच्या मतदारसंघामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे, असे खासदार, आमदार सरकारवर टीका करत आहेत. कांद्याचे भाव वाढतील म्हणून केंद्राने घेतलेल्या या निर्णयावरून बच्चू कडूंनी सरकारबरोबरच लोकांनाच सुनावलं आहे.
Onion Export duty : बच्चू कडू सरकारच्या धोरणाबद्दल काय बोलले?
पिपरी चिंचवड येथे बोलताना बच्चू कडू म्हणाले, “हे सरकार नामर्द आहे. केवळ सत्तेसाठी ग्राहकांचे हित जपण्याच्या दृष्टीने सरकारने हा निर्णय घेतला आहे.”
वाचा >> Onion export duty : फडणवीसांचा जपानमधून अमित शाहांना फोन, केंद्राचा मोठा निर्णय
“कांद्याचे भाव वाढल्यानंतर सरकार हस्तक्षेप करते, मग भाव पडल्यानंतर का करत नाही? असा सवाल बच्चू कडूंनी केलाय. “खाणाऱ्यांचा विचार करता, पिकवणाऱ्याचा नाही. ही नालायक प्रवृत्ती आहे. कांदा परवडत नसेल तर खावू नये, माझ्याकडे लसूण आहे. मुळाही आहे”, अशा शेलक्या शब्दात कडू यांनी सरकारवर टीका केलीय.
ADVERTISEMENT
वाचा >> Maharashtra Politics : शिंदेंची खेळी… 12 आमदार नियुक्तीत ‘मविआ’ला कसा बसला झटका!
‘कांदा खाल्ला नाही म्हणून कोणी मारणार आहे का?’, असा सवालही त्यांनी केलाय. कांदा प्रश्नावरून अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार पडले म्हणून तुम्ही येवढे घाबरता का? असे म्हणत बच्चू कडूंनी मोदी सरकारला खडेबोल सुनावलेत. त्याचबरोबर सरकार विरोधात आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय.
ADVERTISEMENT
विजय गावितांना बच्चू कडूंचा टोला
मंत्री विजय गावित यांच्या मासे खाण्याच्या वक्तव्यावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, “त्यांची तशी मानसिकता आहे, त्यामुळे तसे ते बोलले असतील.” दुसरीकडे नवनीत राणा यांना आलेल्या धमकीच्या मुद्द्यावर बोलताना कडू म्हणाले , “कोण महत्वाचे आहे का?”, असा सवाल करत त्यांनी केला.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT