Devendra Fadnavis : ‘किमान गोपीनाथ मुंडेंचे तरी व्हा’, फडणवीसांवर प्रश्नांचा भडीमार

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Maharashtra Cabinet Meeting in Chhatrapati Sambhaji nagar : A cabinet meeting is being held in Chhatrapati Sambhajinagar. Ambadas Danve has asked questions to Deputy Chief Minister Devendra Fadnavis on this issue.
Maharashtra Cabinet Meeting in Chhatrapati Sambhaji nagar : A cabinet meeting is being held in Chhatrapati Sambhajinagar. Ambadas Danve has asked questions to Deputy Chief Minister Devendra Fadnavis on this issue.
social share
google news

Cabinet Meeting in Chhatrapati Sambhaji Nagar : मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे होत आहे. तब्बल 7 वर्षानंतर ही बैठक होत आहे. त्यामुळे मराठवाड्यासाठी सरकारकडून घोषणा केल्या जाऊ शकतात. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी असंख्य प्रश्न उपस्थित केले आहेत. दानवे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरले आहे.

ADVERTISEMENT

अंबादास दानवे यांनी एक्सवर ट्विट केले आहे. यात त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात मराठवाड्यासाठी करण्यात आलेल्या घोषणांची आठवण करून देत तक्रारींचा पाढा वाचला आहे.

हेही वाचा >> ‘…तरचं मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार’, विनोद पाटलांनी काढला तोडगा

अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे की, “मराठवाड्यासाठी 2016 साली शेवटची कॅबिनेट बैठक देवेद्र फडणवीस सरकारने संभाजीनगरला घेतली होती. आजही ते ‘सुपर सीएम’ च्या भूमिकेत या खोके सरकारमध्ये आहेत. त्यावेळी त्यांनी 49020 कोटींची घोषणा केवळ मराठवाड्यासाठी केली होती. त्यावेळी झालेल्या घोषणांपैकी जवळपास सगळ्याच अपूर्ण आहेत. काही मोजक्या घोषणांबाबत मी आज विचारतो आहे”, असे म्हणत अंबादास दानवे यांनी प्रश्नांचा भडीमार केला आहे.

हे वाचलं का?

अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सवाल

1) शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संभाजीनगरातील घोषित स्मारकाचे काम किती वर्षे चालणार?
2) धाराशिवच्या तेर येथे वस्तुसंग्राहलयसाठी घोषित आठ कोटींचे काम अजूनही सुरूच आहे. भीक देत आहात का?
3) सुमारे 450 कोटींच्या म्हैसमाळ विकास आराखड्याचे काय झाले? आज तिथे जाण्यासाठी नीट वाटही उरलेली नाही.
4) नांदेड जिल्ह्यातील माहूरच्या विकासासाठी घोषित सुमारे 250 कोटी कुठे आहेत? भंपक वागण्यातून देव देवतांना तरी सोडा?
5) लातूरला विभागीय क्रीडा संकुल दिले होते. ते आता चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बांधणार आहात का?
6) मराठवाड्यात डेअरी विकास बोर्डाच्या माध्यमातून 1000 गावात दूध योजना आणून 1.25 लाख लोकांना रोजगार देणार होतात. योजना नक्की मराठवाड्यासाठीच होती की विदर्भासाठी?

हेही वाचा >> Maratha Reservation : तामिळनाडूत 69 टक्के आरक्षण, मग महाराष्ट्रात का अशक्य?

7) संभाजीनगरातील करोडीला ट्रान्सपोर्ट हब बनवणार होतात. अजून जमीन सापडली नाही का?
8) परभणी येथे 68 एकरावर टेक्स्टाईल पार्क उभारणार होतात? तुमच्या अधिकाऱ्यांनी साधी जागा तरी पाहिली आहे का या प्रकल्पासाठी?
9) मराठवाड्याची वॉटर ग्रीड योजना कुठे बारगळली? आज मराठवाडा पुन्हा दुष्काळाच्या काळ्या छायेत गेला आहे.
10) कृष्ण-मराठवाडा सिंचन योजनेसाठी 4800 कोटी देणार होतात. किती कवड्या दिल्या, काम किती झाले?
11) ‘इतर’ सिंचन प्रकल्पांसाठी 1048 कोटी देणार होतात? हे ‘इतर’ कोणते आणि त्याला किती निधी दिला?
12) नगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी 2826 कोटींची कबुली होती. किती निधी दिलात, कारण प्रकल्प अजूनही अपूर्णच आहे.
13) विमानतळ विस्तारीकरणासाठी 200 कोटीची घोषणा केलीत. विस्तार होत राहील, विमानांची नवीन शहरांशी जोडणी संभाजीनगरला मिळावी यासाठी साधे पत्र तरी लिहिले का?
14) संभाजीनगर पॉलिटेक्निकला अभियांत्रिकी महाविद्यालयात रूपांतर करण्यासाठी एक कोटी. सध्याचा गव्हर्नमेंट इंजिनियरिंग कॉलेजमध्ये पुरेसे शिक्षक नसल्याने अनेक विभाग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत, अजून एक कॉलेज देऊन तिथे काय पाहायचे? नुसत्या भिंती?
15) लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या नावाच्या संस्थेला 279 कोटी देणार होतात. प्रत्यक्षात मंजूर केले फक्त 12 कोटी. किमान तुमच्याच पक्षाचे गोपीनाथ मुंडे यांचे तरी व्हा?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Maratha Reservation : 50 टक्क्यांची मर्यादा आली कारण…, सुप्रीम कोर्टाचा निकाल काय?

16) ग्रामीण भागात 1.21 लाख घरे (180 कोटी खर्चून) बांधणार होतात. किती लोकांना छप्पर मिळाले, जरा सांगता का?
17) 25 हजार हेक्टरवर फळबागा उभारण्यासाठी 375 कोटींची कबुली होती. आज ती झाडे मोठी झाली असतील ना? जरा सांगता का, ही बाग नेमकी कुठे आहे?
18) जालन्यात सीड पार्क साठी 109 कोटींचा वायदा होता. तुमच्या या घोषणेची वाट पाहून आज सीड कंपन्यांची मुख्यालये हैद्राबादला स्थलांतरित होत आहेत.

ADVERTISEMENT

‘दिल्लीच्या पातशाहाची सवय’

“यंदा नव्या घोषणांच्या पूर्वी जुन्या यादीचे काय झाले हे पण आपण सांगाल, अशी अपेक्षा मराठवाड्याच्या जनतेला आहे. यंदा संभाजीनगरात येत असताना घोषणा जरा जपूनच करा. कारण आपल्या खोकेबाजीची, धोकेबाजीची नोंद तब्बल 32 देश घेत असतात, असं म्हणतात. तुमच्या दिल्लीश्वर ‘पातशहा’ सवय आहे शब्द फिरवायची/विसरायची. तीच तुम्हालाही लागली आहे”, असा खोचक टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT