Chandrayaan 3: प्रज्ञान रोव्हरच्या वाटेवर भला मोठा खड्डा, कसा मार्ग काढणार? इस्त्रोने दिली माहिती

प्रशांत गोमाणे

ADVERTISEMENT

chandrayaan 3 pragyan rover encounterts huge crafter during moon walk now they change path isro
chandrayaan 3 pragyan rover encounterts huge crafter during moon walk now they change path isro
social share
google news

Chandrayaan 3: प्रज्ञान रोव्हरच्या (Pragyan Rover) वाटेवर भला मोठा खड्डा, कसा मार्ग काढणार? इस्त्रोने दिली माहिती भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवल्यानंतर आता विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरने कामाला सुरूवात केली आहे. दोघेही चंद्रावरील महत्वपुर्ण माहिती शेअर करत आहेत. असे असतानाच आता प्रज्ञान रोव्हरच्या वाटेत मोठा अडथळा आला आहे. ज्या मार्गाने प्रज्ञान रोव्हरच्या चालत आहे, त्या मार्गावर एक भला मोठा खड्डा आहे. आता या खड्डयाला पार करून प्रज्ञान रोव्हर कसा मार्गस्थ करणार आहे याबाबतची माहिती इस्त्रोने दिली आहे. (chandrayaan 3 pragyan rover encounterts huge crafter during moon walk now they change path isro)

ADVERTISEMENT

इस्त्रोने एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत इस्त्रोने म्हटले की प्रज्ञान रोव्हर चंद्रावर फिरत असताना त्याच्या मार्गात एक भला मोठा खड्डा आला आहे. त्यामुळे प्रज्ञान रोव्हरने त्याचा मार्ग बदलला आहे, आणि आता सुरक्षित प्रवास सुरू आहे.

हे ही वाचा : Chandrayaan-3 : आता प्रज्ञान रोव्हर फक्त आठवडाभर काम करणार; कारण समजून घ्या…

चंद्रयान मोहिमेत प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर फिरून संशोधन करत आहे. या संशोधना दरम्यानच प्रज्ञान रोव्हर मार्गात मोठा अडथळा आला होता. प्रज्ञान रोव्हर चालत असलेल्या वाटेवर एक भला मोठा खड्डा आला आहे. त्यामुळे आता प्रज्ञान रोव्हरला माघारी येण्याची सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार प्रज्ञान रोव्हर सुरक्षित माघारी परतला आहे. इस्त्रोने या संबंधित फोटो शेअर करून माहिती दिली आहे.

हे वाचलं का?

इस्त्रोने शेअर केलेल्या या एका फोटोत चंद्रावरचा भला मोठा खड्डा दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत प्रज्ञान रोव्हरच्या पायाचे ठसे उमटले होते. आता प्रज्ञान रोव्हर पुन्हा बेसकँम्पवर परतल्याने त्याची पुढची वाटचाल काय असणार आहे, याबाबत इस्त्रो वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा : NCP चा निकाल ‘या’ दिवशी खरंच लागणार?, राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा दावा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT