Chandrayaan 3 ची मोठी बातमी, सिग्नलबाबत शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा
भारताकडून चांद्रयान 3 चे यशस्वी लॅडिंग केल्यानंतर साऱ्या जगाचे लक्ष त्याकडे आहे. मात्र आता खगोलशास्त्रज्ञ स्कॉट टिली यांनी सांगितले की, आता मिळणारे सिग्नल हे कमकुवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. चांद्रयान 3 कडून पाठवण्यात येणारे सिग्नलमध्ये चढउतार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
ADVERTISEMENT
Chandrayaan 3 : विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांची स्थिती नेमकी काय आहे हे याची उत्सुकता आता प्रत्येकाला लागून राहिली आहे. त्यासाठी युरोपियन स्पेस एजन्सीकडून कौरो (Kouruo) स्पेस स्टेशनवरून चांद्रयान-3 लँडर विक्रमला संदेश पाठवले जात आहेत. मात्र लँडरकडून देण्यात येणार प्रतिसाद हा कमकुवत असल्याचे सांगण्यात आले आहे. ज्या प्रकारे पॉवरफुल रेडिओ फ्रिक्वेन्सी (Radio frequency) येणे अपेक्षित होते, त्याप्रमाणे ते बाहेर येत नसल्याचे खगोलशास्त्रज्ञ स्कॉट टिली यांनी तसा दावा केला आहे. (Chandrayaan 3 Vikram Lander european Space agency continuously sending signals)
ADVERTISEMENT
स्कॉट टिली यांनी याबाबत एक ट्विट करत सांगितले आहे की, चांद्रयान-3 च्या चॅनलवर 2268 मेगाहर्ट्झ उत्सर्जित होत असून ते अगदीच कमकुवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही समस्या निर्माण झाल्यामुळे चांद्रयान-3 च्या लँडरकडून अजूनही कोणत्याही प्रकारचे सिग्नल प्राप्त झाले नाहीत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
🚨
Sad news, this emission just shy of 2268MHz (#Chandrayaan3‘s channel) is in fact from NASA’s LRO. It’s a weak side-band.So that means no definitive signal observations from #Chandrayaan3 thus far. pic.twitter.com/6WMJx1WuAy
— Scott Tilley 🇺🇦 (@coastal8049) September 22, 2023
चंद्राचे प्रतिबिंबामुळे संदेश
स्कॉटने आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, चांद्रयान-3 चे विक्रम लँडर ऑफ-फ्रिक्वेंसी असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. त्याबरोबरच चांद्रयान-3 कडून येणारे संदेश हे कमकुवत असून ईएसए ग्राउंड स्टेशनने पाठवलेल्या संदेशाच्या बदल्यात त्यांना चंद्राच्या प्रतिबिंबामुळे काही संदेश येत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
Kouruo is back. Still emitting on the same relative frequency.
Tune you guys tune! pic.twitter.com/Ig6nW9fE4y
— Scott Tilley 🇺🇦 (@coastal8049) September 22, 2023
सिग्नलमध्ये चढउतार
चांद्रयान 3 कडून पाठवण्यात येणारे सिग्नलमध्ये चढउतार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर पाठवलेले गेलेले संदेश हे कधी स्थिर तर कधी हलत्या स्वरुपाचे असतात असंही स्कॉट टिली यांनी म्हटले आहे. कौरोमधून पाठवलेले सिग्नल स्थिर असून विक्रम लँडरचा ट्रान्सपॉन्डर आरएक्स फ्रिक्वेन्सीचा असल्याचेही त्यांनी सांगितले.
इस्त्रोकडून दुपारपर्यंत माहिती
सध्या, युरोपियन स्पेस एजन्सी आणि इस्रो या दोघांकडूनही चांद्रयान-3 चे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांची काय परिस्थिती आहे त्याबाबत मात्र अजून कोणतीही ठोसपणे सांगण्यात आले नाही. याबाबत इस्त्रोकडून दुपारपर्यंत माहिती देण्यात येणार आहे. त्यामुळे आता इस्त्रो याबाबत काय सांगणार आहे त्याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागून राहिले आहे.
ADVERTISEMENT