Chhagan Bhujbal : अशोक सराफांसोबत भुजबळांनी ‘या’ चित्रपटात केलंय काम

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

chhagan bhujbal shares memories about ashok saraf after maharashtra bhushan puraskar announced
chhagan bhujbal shares memories about ashok saraf after maharashtra bhushan puraskar announced
social share
google news

Chhagan Bhujbal Ashok Saraf : मराठी सिनेसृष्टीला समृद्ध करणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. या निमित्ताने कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. अशोक सराफांसोबतचा जुना फोटो शेअर करताना भुजबळांनी एक किस्सा सांगितला. (Chhagan Bhujbal shares memories about actor Ashok Saraf)

ADVERTISEMENT

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. राज्य सरकारकडून याबद्दलची घोषणा करण्यात आल्यानंतर छगन भुजबळ यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

‘या दिग्गज अभिनेत्याचे काम जवळून पाहता आले’, छगन भुजबळांची पोस्ट काय?

छगन भुजबळ यांनी एक जुना फोटो शेअर केला आहे. यात शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, अभिनेते अशोक सराफ आणि छगन भुजबळ दिसत आहेत. या पोस्टमध्ये भुजबळांनी काय म्हटलंय वाचा…

हे वाचलं का?

“मराठी अभिनय सृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि माझे मित्र अशोक सराफ यांना राज्य सरकारकडून २०२३ चा महाराष्ट्र भूषण हा मानाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन!”

हेही वाचा >> ठाकरेंना मुंबईतील’या’ दोन जागा सोडाव्या लागणार?

“मराठी हिंदी-चित्रपट आणि नाटकांमधून त्यांनी आजवर अनेक विविधरंगी भूमिका साकारत आपल्या अप्रतिम अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. विनोदाच्या ‘टायमिंग’साठी ते खूप प्रसिद्ध आहेत. चाहत्यांमध्ये ‘अशोक मामा’ म्हणून लोकप्रिय असलेले अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याचा मलाही योग आला.”

ADVERTISEMENT

हेही वाचा >> MSC bank scam मधून अजित पवारांबरोबर रोहित पवारही सुटणार? मुंबई पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट

“सुरुवातीपासूनच अभिनयाचे आकर्षण असल्याने मी सामाजिक कामाबरोबरच संधी मिळेल तेव्हा आपली अभिनयाची हौस भागविण्याचा प्रयत्न केला. दैवत, नवरा-बायको या चित्रपटांमधून मी छोट्या भूमिका साकारल्या. विशेष म्हणजे दोन्ही चित्रपटात अशोक सराफ यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. या निमित्ताने या दिग्गज अभिनेत्याचे काम जवळून पाहता आले.”

“ते आजही कला क्षेत्रात सक्रिय आहेत आणि मराठी चित्रपट, नाटकांमधून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत. हा पुरस्कार म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांच्या अष्टपैलू अभिनयाचा आणि कामाचा उचित सन्मान आहे. यापुढेही त्यांनी याप्रमाणेच कलेची सेवा करत रहावी आणि त्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य लाभावे, अशा शुभेच्छा”, अशा शब्दात छगन भुजबळांनी जुन्या आठवणी जागवल्या.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT