Viral Video: पनीरवरून लग्नात राडा, भर मंडपात रक्ताचा सडा…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Clash for not getting paneer in wedding ceremony meal video viral on social media
Clash for not getting paneer in wedding ceremony meal video viral on social media
social share
google news

Viral Video : कोणत्याही लग्न समारंभाध्ये जर जेवणामध्ये पनीर नसेल तर त्यात काही मजा नसते. पै-पाहुण्यांनाही पनीरशिवाय (Paneer) लग्नामध्य जेवण गोड लागत नाही. मात्र असंच एका लग्नात पनीरच्या डिशवरून पै-पाहुण्यांमध्ये मोठं युद्ध रंगलं आहे, आणि थोड्या वेळाने लग्नसमारंभाचं चित्र बदलून थेट कुस्तीचा आखाडाच झाला. एका लग्नातील (wedding ceremony) जेवण करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये (Video Viral) लग्नसमारंभामध्ये आलेली लोकं एकमेकांना खुर्च्या फेकून मारताना दिसत आहेत. तर काही जण एकमेकांची कॉलर पकडतानाही दिसत आहेत.

ADVERTISEMENT

पनीरवरून मारहाण

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये पनीर आणि मटरवरून नवरा-नवरीकडचे पै पाहुणे आमनेसामने आले आणि जोरदार हंगामा झाला. जेवणामध्ये पनीर मिळाले नाहीत म्हणून एकमेकांवर धावत जाऊन मारहाण करण्यास सुरुवात केली. ही मारहाण इतकी टोकाला गेली की, खुर्च्या उचलून एकमेकांच्या डोक्यात घालण्यात आल्या.

हे ही वाचा >> Sunil Kedar : काँग्रेसच्या मोठ्या नेत्याला बँक घोटाळ्यात पाच वर्षांची शिक्षा, प्रकरण काय?

नेमका हा वाद?

लग्न समारंभात पनीरच्या डिशवरून वाद आणि मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच. लोकांना नेमका हा वाद कशासाठी झाला त्याची उत्सुकता लागली होती. सोशल मीडियावर त्यावरुन अनेक सवालही उपस्थित करण्यात आले. हा व्हिडीओ कोणता आहे, वाद का झाला असे एक नाही अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

 

ADVERTISEMENT

पनीरचा खर्च भरून काढला

सोशल मीडियावर एक यूजरने कमेंट केली आहे की, आता पनीरवरून कधी तरी तिसरं महायुद्ध होईल की काय अशी भीती वाटते असं म्हटले आहे. तर एकट्याने कमेंट केली आहे की, पनीर मिळालं नाही म्हणून खुर्च्यांची मोडतोड करून पनीरचे पैसे वसूल केले जात आहेत.

ADVERTISEMENT

कुस्तीचा आखाडा

पनीरवरून झालेला वाद हा काही पहिलाच नाही, याआधीही उत्तर प्रदेशमधील एका लग्नातही असाच प्रसंग घडला होता, आणि त्यांचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता. लग्नात आलेल्या काकीला पनीर मिळालं नव्हतं म्हणून तिने असा काय गोंधळ घातला होता की, लग्न समारंभाचं चित्र कुस्तीच्या आकड्यासारखं झालं होते.

हे ही वाचा >> Girl Dance Video: क्लबमध्ये तरुणीचा ‘असा’ डान्स… एवढा का झालाय Viral?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT