Video : मोहम्मद शमी ठरला देवदूत! भयंकर कार अपघातात वाचवला लाख मोलाचा जीव

मुंबई तक

ADVERTISEMENT

Indian cricketer Bowler Mohammad Shami saves one life in car accident in Nainital
Indian cricketer Bowler Mohammad Shami saves one life in car accident in Nainital
social share
google news

Cricketer News : भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतो. आताही तो पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारण त्याने नैनितालमध्ये झालेल्या एका अपघातातील एका व्यक्तीचे त्याने प्राण वाचवले आहेत. नैनितालमध्ये (Nainital) झालेल्या अपघातात (Car Accident) चक्काचूर झालेल्या कारमधून त्यांनी त्या व्यक्तीला अगदी सुखरूपपणे बाहेर काढले. टीम इंडियाच्या या गोलंदाजाने या अपघाताचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे. त्यामध्ये तो अपघातातील पीडितेला मदत करताना दिसून येत आहे. शमीने सांगितले की, त्या व्यक्तीची कार रस्त्याच्या कडेला जाऊन पडली होती. तो व्हिडीओ शेअर करताना त्याने लिहिले आहे की,तू भाग्यवान आहेस कारण, देवाने तुला दुसऱ्यांदा जीवनदान दिले आहे.

ADVERTISEMENT

शमीने केला व्हिडीओ शेअर

नैनितालजवळ ज्या कारचा अपघात झाला होता, ती कार रस्त्याच्या कडेला असलेल्या ढिगाऱ्यावरून खाली गेली होती. त्या कारमधून अपघातग्रस्त व्यक्तीला शमीने त्याला सुखरूपपणे बाहेर काढले. ज्या अपघाताचा व्हिडीओ शमीने शेअर केला आहे, त्यामध्ये कारचा चक्काचूर झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> मुलाच्या प्रेयसीला भर रस्त्यात केलं विवस्त्र, महिला सरपंचाचं तालीबानी कृत्य

7 सामन्यात 24 विकेट

मोहम्मद शमीने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेतले आहेत. त्याने 7 सामन्यामध्ये 24 विकेट घेतल्या होत्या. मात्र सुरुवातीच्या सामन्यामध्ये तो खेळला नव्हता. मात्र नंतर बांगलादेशविरुद्ध सामना असताना हार्दिक पांड्याच्या दुखापतीमुळे शमीला संधी मिळाली आणि त्या संधीचा त्याने फायदा घेत विकेट घेतले.

हे ही वाचा >> IPL 2024 Retention : KKR ने सोडला ‘लॉर्ड’ खेळाडू, दिल्ली कॅपिटल्स पृथ्वी शॉला…

मोहम्मद शमीने त्या व्यक्तीला अपघातातून वाचवल्यानंतर तो व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर करताचा अनेकांनी त्याला कमेंटही दिल्या आहेत. शमी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. आताही त्याने एकाचा जीव वाचवल्याने चर्चेत तर आलाच मात्र त्याच्या या कामाचे अनेकांनी कौतुकही केले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT