Hardik Pandya IPL: मुंबई इंडियन्सकडे नव्हते पैसे, ‘हा’ खेळाडू देऊन हार्दिकला घेतलं विकत

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

Hardik Pandya traded to Mumbai Indians
Hardik Pandya traded to Mumbai Indians
social share
google news

Hardik Pandya IPL Trade : आयपीएल अर्थात इंडियन प्रीमिअर लीगच्या 2024 मधील हंगामापूर्वी मोठी घडामोड घडली. आयपीएल 2024 च्या आधी एक मिनी लिलाव होणार आहे आणि त्याआधी प्रत्येक फ्रँचायझीने रविवारी (26 नोव्हेंबर) संध्याकाळी आपली रिटेन आणि रिलीज यादी जाहीर केली. चाहते या यादीची आतुरतेने वाट पाहत होते कारण गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्समध्ये सामील होणार असल्याची बातमी आली होती. पण, गुजरातने यादी जाहीर करून पांड्याला कायम ठेवले. हार्दिकसाठी पुरेसे पैसे नसलेल्या मुंबई इंडियन्सने अखेरच्या क्षणी मोठा डाव टाकला आणि हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्सकडून विकत घेतले. (hardik pandya joins mumbai indians in ipl 2024)

ADVERTISEMENT

रिटेन आणि रिलीज याद्या जाहीर झाल्यानंतर दोन तासांनी ही बातमी समोर आली. ट्रान्सफर विंडोच्या माध्यमातून आयपीलएलमधील सर्वात मोठी खरेदी झाली. गुजरातने रिटेन करूनही हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्समध्ये जाण्याला पसंती दिली.

मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्यासाठी मोजले 15 कोटी

हार्दिक पांड्या रोख व्यापाराद्वारे मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आहे. गुजरात आणि मुंबई इंडियन्समध्ये हा करार झाला. पांड्याला १५ कोटींमध्ये करारबद्ध केले आहे. याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही पण ही बातमी काही वेळातच चाहत्यांपर्यंत पोहोचली.

हे वाचलं का?

हेही वाचा >> KKR ने सोडला ‘लॉर्ड’ खेळाडू, दिल्ली कॅपिटल्स पृथ्वी शॉला…

हार्दित पांड्या सुरुवातीपासूनच मुंबई इंडियन्सचा एक भाग होता, पण त्याला 2021 मध्ये सोडण्यात आले होते. त्यानंतर तो गुजरात टायटन्समध्ये सामील झाला होता.

MI कडे नव्हते पैसे, करार कसा झाला?

हार्दिक पांड्याला विकत घेण्यासाठी मुंबई इंडियन्सकडे जास्त पैसे नव्हते. मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये एकूण 15.25 कोटी रुपये होते आणि जर त्यांनी हार्दिकला घेतले असते, तर लिलावात व्यवहारासाठी पैसे शिल्लक राहिले नसते. त्यामुळे पडद्यामागे मुंबईने कॅमेरून ग्रीनचा आरसीबीशी व्यवहार केला.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Virat Kohli-Rohit Sharma : गुडन्यूज! विराट-रोहितला वर्ल्ड कपमधील कामगिरीचं मिळालं फळ

17.50 कोटी रुपयांमध्ये ग्रीनला विकल्यानंतर मुंबईकडे आता हार्दिकला विकत घेण्यासाठी पैसे आहेत. हार्दिकसाठी 15 कोटी रुपये मोजूनही मुंबईकडे कॅमेरून ग्रीनला आरसीबीला दिल्याने पैसे वाचतील आणि त्यामुळे ते लिलावात आणखी खेळाडू खरेदी करू शकतात.

ADVERTISEMENT

पांड्याची कारकीर्द

हार्दिक पांड्या 2022 मध्ये गुजरातमध्ये सामील झाला आणि पहिल्याच सत्रात त्याने संघाला चॅम्पियन बनवले. 2022 च्या आयपीएल फायनलमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध पांड्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला होता.

2023 च्या हंगामात देखील हार्दिकच्या नेतृत्वाखाली संघ अंतिम फेरीत पोहोचला होता, पण संघ धोनीच्या चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पराभूत झाला आणि संघ उपविजेता ठरला.

हेही वाचा >> IPL ऑक्शनआधीच मोठा करार! राजस्थानकडून 10 करोडमध्ये ‘हा’ खेळाडू खरेदी

हार्दिक पांड्या सहा हंगामात मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. तो संघात असतानाच मुंबईने 2015, 2016, 2017 आणि 2019 मध्ये विजेतेपद पटकावले आहे. पण 2021 मध्ये टीमने त्याला सोडले. पांड्याने 123 आयपीएल सामन्यात 2309 धावा केल्या आहेत. या काळात त्याची सरासरी 30.38 आणि स्ट्राइक रेट 145.86 होता. पांड्याने 10 अर्धशतके झळकावली आहेत, तर एकूण 53 विकेट्स घेतल्या आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT